India vs England Test : रडका बाळ...! जडेजा-सुंदरने लवकर ड्रॉ नाकारला, स्टोक्सचा पारा चढला; मँचेस्टर कसोटीत नेमकं काय घडलं?

Jadeja-Sundar Manchester Test 2025 : मँचेस्टर कसोटीत भारताने पराभव टाळत सामना ड्रॉ केला, पण या निकालापेक्षा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या वर्तनाचीच चर्चा अधिक रंगली.
India vs England Manchester Test 2025
India vs England Manchester Test 2025file photo
Published on
Updated on

India vs England Manchester Test 2025

मँचेस्टर : मँचेस्टर कसोटीत रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शौर्यपूर्ण भागीदारीने भारताने पराभव टाळत सामना ड्रॉ केला, पण या निकालापेक्षा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या वर्तनाचीच चर्चा अधिक रंगली. सामना अनिर्णित होणार हे स्पष्ट झाल्यानंतरही भारतीय फलंदाजांनी शतकासाठी खेळणे पसंत केल्याने स्टोक्सचा पारा चढला आणि त्याने मैदानावरच नाराजी व्यक्त केली.

मँचेस्टरमध्ये चौथा सामना चांगलाच रंगला होता. शेवटच्या दिवशी इंग्लंडकडून भारताला लवकर ड्रॉचं ऑफर देण्यात आलं, मात्र रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने ते नाकारत आपापली शतकी खेळी पूर्ण केली. या दोघांच्या दमदार फलंदाजीमुळे सामना अनिर्णित राहिला. कर्णधार बेन स्टोक्सने भारताला शेवटच्या दिवशी लवकर ड्रॉ मान्य करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावेळी भारताची धावसंख्या ४ बाद ३८६ होती आणि दोन्ही फलंदाज आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर होते. त्यामुळे जडेजा आणि सुंदरने फलंदाजी सुरू ठेवत शतकी खेळी पूर्ण केली. जडेजाने १८२ चेंडूत आपलं पाचवं शतक झळकावलं तर सुंदरने २०६ चेंडूत आपला पहिला कसोटी शतक साजरा केला. दोघे अनुक्रमे १०७ आणि १०१ धावांवर नाबाद राहिले. शुभमन गिलने दोघांच्या निर्णयाचं समर्थन केले. "त्यावेळी ते दोघं ९०च्या आसपास होते, आणि त्यांनी कमालीची फलंदाजी केली. त्यामुळे त्यांना शतकाचं पूर्ण श्रेय मिळायला हवं होतं," असे गिलने म्हटले.

स्टोक्सचा पारा चढला

जडेजा आणि सुंदरने ड्रॉचा प्रस्ताव नाकारल्याने इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स संतापला आणि त्याने जडेजाला उपरोधिकपणे डिवचले, "जड्डू, तुला काय हॅरी ब्रूक आणि जो रूटविरुद्ध शतक करायचंय का?" स्टोक्सच्या या वागण्याने खेळभावनेला गालबोट लागले. स्टंप माईकमध्ये इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूचे वाक्य ऐकू आले, "जर तुला शतक करायचेच होते, तर आधी तशी फलंदाजी करायला हवी होतीस." जडेजाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांत राहिला आणि खेळत राहिला.

सुनील गावसकर चांगलेच संतापले

त्यावेळी समालोचन करणारे सुनील गावसकर हे पाहून चांगलेच संतापले. त्यांनी स्टोक्सच्या वागण्यावर टीका केली आणि जडेजा व सुंदरला शेवटचा संपूर्ण तास खेळून काढण्याचा आणि प्रतिस्पर्ध्यांना आणखी घाम गाळायला लावण्याचा सल्ला दिला. त्यांची भूमिका स्पष्ट होती, जर खेळाच्या भावनेला धक्का न लावता किंवा संघाच्या निकालाला धोका न पोहोचवता वैयक्तिक टप्पे गाठता येत असतील, तर ते नक्कीच मिळवले पाहिजेत.

स्टोक्सचे 'हट्टी मुला'सारखे वागण्याचे लक्षण

या प्रकारावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तीव्र टीका केली. मांजरेकर यांनी स्टोक्सच्या वर्तनाला 'हट्टी मुला'सारखे म्हटले. "फलंदाज मैदान सोडत नाहीत आणि आपल्या प्रमुख गोलंदाजांना पुन्हा गोलंदाजी करावी लागत आहे, यामुळे नाराज होणे एकवेळ समजू शकतो. पण असे सोपे चेंडू टाकून नाराजी व्यक्त करणे, हे बेन स्टोक्सच्या 'हट्टी मुला'सारख्या वागण्याचे लक्षण होते. तुम्हाला शतक करायचेच होते, तर मग आमच्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध का केले नाही? ही त्याची तक्रार होती. पण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही. त्याने ती परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला हवी होती," असे मांजरेकर म्हणाले. भारताच्या या अविस्मरणीय ड्रॉनंतरही स्टोक्सच्या वागण्याने या प्रसंगाला एक कटू किनार लाभली आणि क्रिकेट जगतात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

"काय रडका बाळ आहे..." सोशल मीडियावर स्टोक्स ट्रोल

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले, "हे असे वागतात... बेन स्टोक्सला थोडासा नकारही सहन झाला नाही. भारताने त्याचा सामना अनिर्णित करण्याचा प्रस्ताव नाकारताच त्याचा अहंकार दुखावला. त्याने जडेजा सोबत हस्तांदोलनही टाळले... तो इतका दुखावला होता! अरे बेन... चिडचिड करू नकोस, खिलाडूवृत्ती दाखव." दुसऱ्या एका युझरने लिहिले, "काय रडका बाळ आहे. कसोटी शतक प्रत्येकासाठी नेहमीच खास असते यार." तर दुसऱ्याने, "चिडखोर इंग्रज," अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. एका युझरने तर खोचकपणे म्हटले, "स्टोक्सने आभारी असायला हवे की जडेजा आणि वॉशिंग्टन शतके झाल्यावर मैदानाबाहेर गेले. जर या रडक्या बेनने विराट कोहलीसोबत असा मूर्खपणा केला असता, तर विराटने संपूर्ण १५ षटके फलंदाजी केली असती."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news