चेन्नई : भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. तो सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या बुची बाबू या आमंत्रितांच्या स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत त्याने मध्य प्रदेशविरुद्ध शतकी (११४) खेळी केली. यात त्याने १० षटकार ठोकले.
या सामन्यात मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ९१.३ षटकांत सर्वबाद २२५ धावा केल्या. त्यानंतर झारखंड संघाने शिखर मोहनची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती, पण त्यानंतर शरणदीप सिंग, विकास विशाल, कुमार सूरज आणि आदित्य सिंग यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इशान ६ व्या क्रमांकावर उतरला. त्याने आक्रमक खेळी करताना शतक केले आहे. यासह वो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचेही दाखवून दिले. त्याने १०७ चेंडूत ११४ धावांची खेळी केली, या खेळीत त्त्याने ५ चौकार आणि १० पटकार मारले, त्याने ६१ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर तो आणखी आक्रमक खेळताना केला. त्यामुळे झारखंडने या सामन्यात आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, पहिल्या डावात मध्य प्रदेशकडून शुभम खुशवाहने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली, तर अरहम अकिलने ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे मध्य प्रदेश २२५ धावांपर्यंत पोहोचले. झारखंडकडून शुभम सिंग आणि सौरभ शेखर यांनी प्रत्येकी ३ विकेटस् घेतल्या. तसेच विवेकानंद तिवारी आणि आदित्य सिंग यांनी प्रत्येकी २ विकेटस घेतल्या.