PBKS vs RCB Qualifier 1 : गुणतालिकेतील दुसरा नंबर RCB साठी ‘लकी’, IPL फायनलचे दरवाजे उघडणार ‘हा’ योगायोग; जाणून घ्या आकडेवारी

जर हा योगायोग यावेळीही खरा ठरला, तर RCB अंतिम फेरीत खेळेल हे निश्चित मानले जाऊ शकते.
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1
Published on
Updated on

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1

पहिल्या हंगामापासून पहिल्या आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ 18 व्या हंगामात स्वप्नपूर्तीसाठी पुन्हा सज्ज झाला आहे. चाहत्यांनाही संघाकडूनन हीच अपेक्षा आहे. यंदाच्या हंगामात संघाची मैदानावरील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांचीही महत्त्वाची भूमिका दिसून आली आहे.

आरसीबीने लीग टप्प्यात घराबाहेर एकूण 7 सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. त्यांनी 14 सामन्यात 17 गुण मिळवून पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. आता क्वालिफायर-1 मध्ये, आरसीबीचे धुरंदर खेळाडू पंजाब किंग्ज संघाशी भिडणार आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये असा योगायोग घडत आहे जो आरसीबीसाठी अंतिम फेरीचे दार उघडत आहे.

असा आहे योगायोग...

2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला. तेव्हा लीग टप्प्यात टॉप-4 मध्ये पोहचलेल्या संघांमध्ये सेमीफायनल सामना खेळवला जात होता. 2011 च्या आयपीएल हंगामापासून प्लेऑफ नियम लागू करण्यात आला. यामध्ये, पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 वर असलेल्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याची अतिरिक्त संधी मिळू लागली. यामध्ये, क्वालिफायर-1, एलिमिनेटर सामना आणि क्वालिफायर-2 असे सामने खेळवले जाऊ लागले. 2011 ते 2024 पर्यंत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात, लीग टप्प्यात पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-2 वर असलेल्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1
AI RCB win IPL Trophy : चकाकणा-या IPL विजेतेपदाची प्रतीक्षा, RCB कट्टर फॅन्सच्या हृदयातील एकमेव आशा!

अशा परिस्थितीत, जर हा योगायोग यावेळीही खरा ठरला, तर आरसीबी संघ अंतिम फेरीत खेळेल हे निश्चित मानले जाऊ शकते. आरसीबीने 2016 च्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तेव्हा त्या हंगामातही हा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता.

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1
IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB : अय्यरची रणनीती की आरसीबीची प्रतिभा.. कोण कोणावर मात करणार?

दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाने जिंकली 8 वेळा ट्रॉफी

2011 मध्ये प्लेऑफ नियम लागू झाल्यापासून लीग स्टेजच्या शेवटी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाने प्रत्येक वेळी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले असून 8 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. लीग स्टेजमध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेल्या संघाने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ फक्त एकदाच विजेता झाला आहे. शिवाय, चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1
Shubman Gill Ruled Out : टीम इंडियाला झटका! कर्णधार शुभमन गिलची अचानक माघार, इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यांमधून बाहेर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news