

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwani Kumar IPL History : मुंबई इंडियन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारने (Ashwani Kumar in IPL 2025) इतिहास रचला. त्याने IPLच्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतल्या आणि प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळवला. विशेष म्हणजे, अश्विनीने आपल्या IPL कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद करून ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. अशी कामगिरी करणारा तो IPLमधील 10 वा गोलंदाज ठरला आहे.
याशिवाय, अश्विनी आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा तिसरा गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी अली मुर्तझा आणि अल्जारी जोसेफ यांनी हा पराक्रम केला होता. सोमवरी (दि. 31) मुंबई इंडियन्सने केकेआरचा 8 विकेट्सने पराभव केला. अश्विनीने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या.
इशांत शर्माने आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याने 2008 मध्ये केकेआरकडून खेळताना आरसीबीच्या राहुल द्रविडला बाद केले होते.
2008 : इशांत शर्मा (KKR) : विरुद्ध राहुल द्रविड (RCB)
2008 : विल्किन मोटा (PBKS) : विरुद्ध सुरेश रैना (CSK)
2009 : शेन हारवुड (RR) : विरुद्ध अझहर बिलखिया (DC)
2009 : अमित सिंह (RR) : विरुद्ध सनी सोहल (PBKS)
2009 : चार्ल लँगवेल्ड्ट (KKR) : रोब क्वीनी (RR)
2010 : अली मुर्तझा ( MI) : विरुद्ध नमन ओझा (RR)
2012 : टीपी सुधीन्द्र (DC) : विरुद्ध फाफ डु प्लेसिस (CSK)
2019 : अल्जारी जोसेफ (MI) : विरुद्ध डेविड वॉर्नर (SRH)
2022 : मथीशा पथिराना (CSK) : विरुद्ध शुभमन गिल (GT)
2025 : अश्वनी कुमार (MI) : विरुद्ध अजिंक्य रहाणे (KKR)