LSG vs SRH : लखनौने फोडला विजयाचा नारळ! शमी-ऋषभ पंत चमकले, हैदराबादची झुंज शेवटच्या षटकात अपयशी

LSG vs SRH : लखनौने फोडला विजयाचा नारळ! शमी-ऋषभ पंत चमकले, हैदराबादची झुंज शेवटच्या षटकात अपयशी
Published on
Updated on

हैदराबाद : अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भेदक स्पेल आणि कर्णधार ऋषभ पंतची संयमी पण तितकीच स्फोटक फलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्‌‍ने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह लखनौने यंदाच्या हंगामातील आपल्या गुणांचे खाते उघडले आहे.

शमीचा ‌‘स्पेल ऑफ द सीझन‌’

35 वर्षीय मोहम्मद शमीने आज केवळ हैदराबादच्या फलंदाजांनाच नव्हे, तर निवड समितीलाही आपल्या धारदार गोलंदाजीने चोख प्रत्युत्तर दिले. आपल्या 4 षटकांच्या कोट्यात शमीने तब्बल 18 ‌‘डॉट बॉल्स‌’ टाकत केवळ 9 धावा देऊन 2 बळी टिपले. त्याने आपल्या सलग दोन षटकांत अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या फॉर्मात असलेल्या सलामी जोडीला तंबूत धाडले. त्याला युवा प्रिन्स यादवने (2/34) उत्तम साथ दिली.

क्लासेन-रेड्डीची झुंज

सुरुवातीला 35 धावांत 4 गडी गमावलेल्या हैदराबादची अवस्था बिकट होती. मात्र, हेन्रिक क्लासेन (41 चेंडूंत 62) आणि नितीशकुमार रेड्डी (33 चेंडूंत 56) यांनी पाचव्या गड्यासाठी 116 धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला 156 धावांपर्यंत पोहोचवले. एकवेळ हैदराबाद 200 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत असतानाच, लखनौच्या गोलंदाजांनी शेवटच्या 2.2 षटकांत अवघ्या 14 धावांत 5 बळी घेत हैदराबादचा डाव 156 धावांवर रोखला.

संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 9/156 (हेन्रिक क्लासेन 62, नितीशकुमार रेड्डी 56. मोहम्मद शमी 2/9, प्रिन्स यादव 2/34).

लखनौ सुपर जायंटस्‌‍: 19.5 षटकांत 5 बाद 159. (ऋषभ पंत नाबाद 68, एडन मार्कराम 45. हर्ष दुबे 1/22).

ऋषभ पंतचा ‌‘कॅप्टन्स नॉक‌’

157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एडन मार्करामने (45 धावा) लखनौच्या विजयाचा पाया रचला. मात्र, सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला. अखेरच्या 6 चेंडूंत 9 धावांची गरज असताना ऋषभ पंतने (50 चेंडूंत नाबाद 68) जयदेव उनाडकटला सलग दोन चौकार मारून सामना खिशात घातला. टेनिसच्या ‌‘फोरहँड स्लॅप‌’सारखा त्याने मारलेला चौकार प्रेक्षणीय होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news