IPL 2026 BCCI News Rule: स्लीपर, स्लिव्ह लेसवर बंदी... खेळाडू, कुटुंबीयांचा वेगळा प्रवास... BCCI चे नवे नियम चर्चेत

IPL 2026 BCCI News Rule
IPL 2026 BCCI News Rulepudhari
Published on
Updated on

IPL 2026 BCCI News Rule: बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी सर्व संघांना काही नियमावली घालून दिली आहे. हे नियम सराव सत्र, प्रवास आणि सामन्यादिवशी संघांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत यासाठी तयार करण्यात आले आहेत. याबाबतची नोट संघ व्यवस्थापकांना पाठवण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार सरावावेळी एका संघाला दोन नेट्स पुरवले जातील. तसेच मख्य विकेट स्क्वेअरवर वन साईड विकेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वानखेडेवर जर दोन्ही संघ एकाचवेळी सराव करणार असतील तर प्रत्येक संघाला दोन खेळपट्ट्या पुरवल्या जातील.

IPL 2026 BCCI News Rule
IPL 2026 : ३ कोटींचा अष्टपैलू IPL मधून बाहेर, सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका

या गोष्टी करता येणार नाहीत

  • बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार जर एखाद्या संघाचा सराव लवकर संपला तर त्यांची खेळपट्टी दुसऱ्या संघाला वापरता येणार नाही.

  • सामन्यादिवशी मुख्य खेळपट्टीच्या चौकोनात फिटनेस टेस्ट आयोजित करण्यास मनाई असेल.

  • सरावाच्या दिवशी संघातील खेळाडूंना स्टेडियममध्ये टीम बसमधूनच यावं लागणार आहे. जरी दोन ग्रुप केले असले तरी टीम बसचाच वापर करावा लागणार आहे.

  • खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय यांनी वेगवेगळाच प्रवास केला पाहिजे. कुटुंबीय आणि खेळाडू हे वेगळ्या वाहनाने प्रवास करू शकतात आणि सराव सत्र हॉस्पिटॅलिटी एरियातून पाहू शकतात.

IPL 2026 BCCI News Rule
IPL 2026 च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट; 2 टप्प्यांत होणार घोषणा! निवडणुकांच्या 'गुगली'वर BCCIचा मास्टरस्ट्रोक

असे असतील सामन्यादिवशीचे नियम

  • खेळाडूंना एलईडी बोर्ड्सवर बॉल मारण्यास मनाई असेल. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या हिटिंग नेट्सचाच वापर करायचा आहे.

  • खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना एलईडी समोर बसता येणार नाही. त्यांनी राखीव खेळाडूंसाठी ठरवून दिलेल्या बसण्याच्या जागेवरच बसायचं आहे.

  • खेळाडूने ऑरेंज आणि पर्पल कॅप घालणे बंधनकारक असेल. जर ते पूर्णवेळ घालणार नसले तर निदान त्यांनी पहिले दोन ओव्हर ही कॅप घालणं बंधनकारक असेल जेणेकरून ब्रॉडकास्टर्सना त्यांना शूट करता येईल.

  • पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये स्लीव्ह लेस जर्सी आणि स्लीपर घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या नियम उल्लंघनावर वॉर्निंग आणि दुसऱ्या नियमभंगावेळी आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news