IPL 2025 : श्रेयस अय्यर होणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार?

IPL चॅम्पियन अय्यरला KKR दाखवला बाहेरचा रस्ता
IPL 2025 Shreyas Iyer
श्रेयस अय्यरFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 Shreyas Iyer : आयपीएल 2024 चे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर)ने पटकावले. श्रेयस अय्यर या संघाचे नेतृत्व करत होता. केकेआरचे हे तिसरे आणि श्रेयस अय्यरचे पहिले आयपीएल विजेतेपद ठरले. पण अचानक काय झाले की आयपीएल चॅम्पियन बनवणा-या अय्यरला केकेआर फ्रँचायझीने रिलीज केले. तथापि, एखाद्या संघाने आपल्या चॅम्पियन कर्णधाराला रिलीज करणे हे दुर्मिळ आहे. आता पुढील आयपीएलमध्ये अय्यर कोणत्या संघाकडून खेळताना दिसेल हा प्रश्न आहे. तो पुन्हा कर्णधार होईल की फक्त खेळाडू म्हणून खेळताना दिसेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अय्यरचे दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन?

अय्यर आतापर्यंत फक्त दोन संघांसाठी आयपीएल खेळला आहे. प्रथम त्याने दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले. पण संघाला चॅम्पियन बनवता आले नाही. यानंतर तो केकेआरमध्ये गेला आणि तिथे आपल्या संघाला विजयी करण्यात यश मिळवले. मात्र यानंतरही त्याला आपला जुना संघ सोडावा लागला. दरम्यान, अय्यर दिल्ली कॅपिटल्समध्ये परत येऊ शकतो अशी बातमी आहे. ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सशी फारकत घेतली आहे, त्यामुळे आता डीसी देखील नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अय्यर पुन्हा या संघाचा कर्णधार होणार असल्याचे मानले जात आहे.

अय्यरसमोर आव्हाने

डीसीशिवाय इतरही काही संघ कर्णधाराच्या शोधात आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरचे नाव लिलावात घोषित झाल्यावर त्याला अनेक संघ घेण्यास इच्छुक असतील. पण तो ज्या संघात जाईल त्या संघाला चॅम्पियन बनवण्याचे त्याच्यापुढे आव्हान असेल. पैशांसोबतच समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करणं त्याच्यासाठी सोपं नसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news