IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा विक्रम, प्लेऑफ गाठणा-या संघाविरुद्ध विजयाची पाटी कोरी

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांचा पुढचा मार्ग सोपा नाही. GT, RCB, PBKS यांच्याविरुद्ध त्यांना या हंगामात एकही सामना जिंकता आलेला नाही.
Mumbai Indians IPL 2025
मुंबई इंडियन्स संघसंग्रहीत छायाचित्र
Published on
Updated on

ipl 2025 mumbai indians not defeat playoff teams punjab kings rcb and gt

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (एमआय)साठी आतापर्यंतचा हंगाम खूप चढ-उताराचा राहिला आहे. पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सुरुवातीला एकामागून एक पराभवांना सामोरे जावे लागत आहे आणि नुकताच पंजाब किंग्ज (पीबीकेएस)ने एमआयला झटका देत शेवटच्या साखळी सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. या पराभवामुळे मुंबईच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. या हंगामात त्यांना अद्याप प्लेऑफ पात्रता फेरीतील कोणत्याही संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

मुंबईच्या पराभवाची मालिका

मुंबई इंडियन्सला या हंगामात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध दोनदा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध एकदा आणि आता पंजाब किंग्ज विरुद्ध एकदा पराभव पत्करावा लागला आहे. जीटी, आरसीबी आणि पीबीकेएस या तिन्ही संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या यादीत मुंबईने स्थान पक्के केले आहे. मात्र पंजाबकडून पराभव पत्करल्यानंतर ते फक्त क्वालिफायर-2 खेळतील.

Mumbai Indians IPL 2025
MI Vs PBKS : पंजाब क्वालिफायर-1 मध्ये

मुंबईच्या खेळात सातत्य नसल्यामुळे त्यांच्यासाठी आयपीएलची शर्यत अधिक कठीण होत आहे. आता, अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, मुंबई इंडियन्सना केवळ दोन सामने खेळावे लागणार नाहीत तर सातत्य राखून दोन्ही सामने जिंकावे लागतील. अन्यथा, त्यांच्यासाठी आयपीएलचा हा हंगाम संपुष्टात येईल.

Mumbai Indians IPL 2025
IPL 2025 Suryakumar Yadav : सूर्याचा नवा विश्वविक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला इतिहास

पंजाबविरुद्ध एकतर्फी पराभव

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही कोसळली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईची सुरुवात संथ झाली आणि सूर्या वगळता टॉप-ऑर्डरमधीक फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत. अखेर सूर्याच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी 184 धावांपर्यंत मजल मारली. स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबई संघात ना फलंदाज धावा काढू शकले आणि ना गोलंदाज पंजाबच्या फलंदाजांना रोखू शकले. प्रत्युत्तरात पंजाबने 9 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.

Mumbai Indians IPL 2025
IND vs ENG Test Series History : इंग्लंडमध्ये ‘या’ 3 भारतीय कर्णधारांनीच जिंकली कसोटी मालिका, धोनी-कोहलीही पडले मागे
Mumbai Indians IPL 2025
Sikandar Raza : इंग्लंडविरुद्धची कसोटी ते PSL ट्रॉफी: सिकंदर रझाची अजरामर खेळी, अवघ्या 24 तासांत लिहिली विजयाची गाथा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news