IPL final 2025 | IPL फायनल कोण जिंकणार, पंजाब की बंगळूर ? AI ने दिलं उत्तर

RCB vs Punjab AI prediction IPL final winner | अंतिम सामन्यात RCB आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. यंदाचा विजेता कोण होणार, यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने भाकीत केलं आहे. चॅट जीपीटीने दिलेलं उत्तर थरारक आहे!
RCB vs Punjab AI prediction IPL final winner |
RCB vs Punjab AI prediction IPL final winner file photo
Published on
Updated on

RCB vs Punjab AI prediction IPL final winner |

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आज होणाऱ्या मेगा मॅच बद्दल जगभरातील कोट्यवधी चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अनेकजण संभाव्य विजेत्याबद्दल आपलं मत सांगत आहेत. प्रत्येक प्रश्नाच उत्तर देणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसने ही आयपीएलचा विजेता घोषित केला आहे. आजचा सामना कोण जिंकणार? अस प्रश्न एआयला विचारण्यात आला. यावेळी एआयने दिलेलं उत्तर तुम्हाला पटेलं का?

सध्याचा जमाना 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' म्हणजेच 'कृत्रिम बुद्धिमत्ते'चा आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे वेगळे क्षेत्र बनले आहे, त्याची कक्षा विस्तारत आहे आणि विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे. हे तंत्र हळूहळू माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत आहे. लोक चॅटबॉट आल्यापासून त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. कोणी भविष्याशी संबंधित, तर कोणी कव्हर लेटर, गाणी तसंच रिझ्यूम यासंबंधी प्रश्न विचारत आहेत. आज आयपीएल अंतिम सामना आहे. त्यामुळे एआयला आज फायनल कोण जिंकेल असा प्रश्न विचारला.

RCB vs Punjab AI prediction IPL final winner |
IPL 2025 final | आज RCB आणि Punjab मध्ये थरार..., जाणून घ्या अंतिम सामना फ्री कुठे पाहाल?

एलॉन मस्क यांचे ग्रोक काय म्हणते?

एलॉन मस्क यांच्या प्लॅटफॉर्मवरील 'ग्रोक' म्हणते की आरसीबीला अगदी जवळच्या फरकाने विजेतेपद मिळण्याची शक्यता आहे. जर या संघाने गोलंदाजीत शिस्त दाखवली आणि त्यांचे फलंदाज चहलवर चांगले नियंत्रण ठेवू शकले तर आरसीबी गेल्या १७ वर्षांचा दुष्काळ संपवू शकेल. त्याचवेळी, ते असेही म्हणते की जर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी केली आणि फिरकीपटूंचा प्रभावीपणे वापर केला तर पंजाब पहिल्यांदाच विजेता बनू शकेल.

चॅट जीपीटीचे अजब भाकीत

चॅट जीपीटी' ने भाकीत केले आहे की आरसीबीचा सध्याचा फॉर्म आणि पंजाब विरुद्धचा अलिकडचा विजय यामुळे त्यांना जेतेपदाच्या दाव्यात थोडे पुढे ठेवता येईल. पंजाबचा प्रतिआक्रमण आणि मजबूत नेतृत्व त्यांना धोकादायक प्रतिस्पर्धी बनवते. त्यामुळे त्यांचा देखील विजय नाकारता येत नाही.

गुगल जेमिनीने सांगितलं विराटचा संघ...

याशिवाय, आणखी एका एआय गुगल जेमिनीने भाकीत केले आहे की आरसीबी थोड्याशा फायदेशीर स्थितीत आहे. त्याचे कारण त्यांचा अलीकडील फॉर्म आहे. त्यांनी क्वालिफायर १ मध्ये पंजाबचा सहज पराभव केला. आरसीबीने पंजाबला फक्त १०१ धावांवर बाद केले. नंतर फक्त २ विकेट्स गमावून १० षटकांत लक्ष्य सहज गाठले. ही गोष्ट आरसीबीला फायदेशीर ठरते.

रजत, अय्यर, विराटला खुणावतोय नवा विक्रम !

आजच्या 'आयपीएल' फायनलच्या निमित्ताने विराट कोहली, श्रेयस अय्यर व रजत पाटीदार यांना नवा विक्रम खुणावत असणार आहे. रजत पाटीदारकडे येथे शेन वॉर्न, रोहित शर्मा व हार्दिक पंड्या यांच्यानंतर आपल्या नेतृत्वाच्या पहिल्याच हंगामात विजेतपद खेचून आणणारा चौथा कर्णधार बनण्याची संधी असेल. याशिवाय, श्रेयस अय्यरकडे दोन विभिन्न संघांकडून दोन 'आयपीएल' जेतेपदे जिंकण्याची नामी संधी असणार आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे विराट कोहलीने येथे 'आयपीएल' जिंकण्यात यश मिळवले, तर त्याच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये वन-डे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप व २ चॅम्पियन्स ट्रॉफींसह 'आयपीएल' ट्रॉफीचाही समावेश होऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news