IPL फायनलमध्ये होणार ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष! BCCI ची विशेष तयारी

IPL 2025 Closing Ceremony | BCCI ने भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी विशेष आयोजन केले आहे. IPL 2025 च्या समारोप सोहळ्यात लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला जाणार आहे.
IPL 2025 Closing Ceremony
IPL 2025 Closing Ceremony file photo
Published on
Updated on

IPL 2025 Closing Ceremony |

दिल्ली : आयपीएल २०२५ या १८ व्या हंगामाचा शेवटचा सामना ३ जून रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यावेळी होणाऱ्या समारोप समारंभात 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचा जल्लोष केला जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने खास तयारी केली असून तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या कारवाईत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. दहशतवाद विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. आता 'ऑपरेशन सिंदूर'चा विजय आयपीएल २०२५ च्या समारोप समारंभात साजरा केला जाणार आहे.

IPL 2025 Closing Ceremony
MI Vs PBKS : पंजाब क्वालिफायर-1 मध्ये

बीसीसीआयने संरक्षण प्रमुखांसह 'या' लोकांना केले आमंत्रित

आयपीएलच्या अंतिम सामन्यात बीसीसीआयने खास पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संरक्षण प्रमुख तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. सैकिया म्हणाले, "बीसीसीाय आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. ज्यांचे 'ऑपरेशन सिंदूर' मधील शूर सैनिकांचे यश राष्ट्राच्या रक्षणासाठी प्रेरणा देत आहेत. शूर वीरांना श्रद्धांजली म्हणून, आम्ही समारोप समारंभ सशस्त्र दलांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे."

भारत पाकिस्तान तणावामुळे आयपीएलमधील सामने एक आठवडा पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर १७ मे रोजी स्पर्धा पुन्हा सुरू झाली. अंतिम सामना आधी २५ मे रोजी कोलकाता येथे खेळवण्यात येणार होता. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आता या स्पर्धेचा अंतिम सामना ३ जून रोजी होणार आहे. प्लेऑफ सामने २९ मे रोजी सुरू होतील, ज्यामध्ये मुल्लानपूरमध्ये पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना खेळवण्यात येईल.

मुंबई इंडियन्सचा पराभव; चौथ्या स्थानावरच राहिले

सोमवारी (26 मे) पंजाब किंग्जने जयपूरला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 7 विकेटस्ने पराभूत केले. हा दोन्ही संघांचा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना होता. पंजाबने या विजयासह पॉईंटस् टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर उडी मारली. इतकेच नाही, तर त्यांनी पहिल्या दोन क्रमांकामध्येही आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना क्वालिफायनर-1 सामन्याचे तिकीटही पक्के केले. ते आता त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच मुल्लनपूर येथे क्वालिफायर-1 चा सामना खेळताना दिसतील. मात्र, मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे चौथ्या क्रमांकावरच राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता आरसीबी किंवा गुजरातविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news