IPL 2025 : रोहित शर्मा आरसीबीचा कर्णधार होणार? एबीडीने केला मोठा खुलासा

IPL 2025
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्मा खूप चर्चेत राहिला. मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवले आणि त्याच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात आले. या सर्वात मोठ्या बदलामुळे खळबळ उडाली. चाहते नाराज झाले. माजी खेळाडूंनी टीका केली. दरम्यान, हिटमॅन मुंबई इंडियन्स सोडून पुढच्या हंगामात दुस-या संघाकडून खेळेल अशा बातम्या येऊ लागल्या. अशातच आता द. आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक मोठा दावा करून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. रोहित शर्मा आरसीबीमध्ये येणार असल्याचे त्याने भाकीत वर्तवले.

आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्मा लखनऊ सुपर जायंट्सचा भाग असेल असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, पण एबी डिव्हिलियर्सने या प्रकरणात नवा ट्विस्ट आणला आहे.

डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटलंय की, ‘रोहित विषयीच्या गोष्टीवर मी जवळजवळ हसलो. जर रोहित मुंबईहून आरसीबीमध्ये गेला तर ती एक मोठी बातमी असेल. कल्पना करा की हेडलाइन काय असेल? हार्दिकच्या जाण्यापेक्षा ही मोठी बातमी आहे. हार्दिक गुजरात संघातून पुन्हा एमआयमध्ये परतला, हे फार मोठे आश्चर्य नव्हते. पण रोहित मुंबई इंडियन्स सोडेल असे मला दिसत नाही.’

फाफ डू प्लेसिस होणार बंगळुरूचा कर्णधार?

फाफ डु प्लेसिस 2024 मध्ये आरसीबीचे नेतृत्व करताना दिसला होता. सध्या डु प्लेसिस 40 वर्षांचा आहे. वाढते वय त्याच्या कर्णधारपदाच्या आडवे येते आहे. दरम्यान, डिव्हिलियर्सने डु प्लेसिसचे समर्थन करत म्हटले, ‘वय हा फक्त एक आकडा आहे. मला वाटत नाही की 40 वर्षांचे होणे ही समस्या असेल. तो गेल्या काही हंगामांपासून संघात आहे आणि खेळाडूंना त्याची सवय झाली आहे. त्याच्यावर आरसीबीसाठी ट्रॉफी न जिंकण्याचे दडपण आहे, मला वाटते की कोहली त्याच्या अनुभवी सहकाऱ्याला साथ देईल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news