IPL 2024 : पराभवाची मालिका, मग विजयाचा ‘षटकार’! ‘या’ 5 खेळाडूंनी बदलले RCBचे नशीब

IPL 2024 : पराभवाची मालिका, मग विजयाचा ‘षटकार’! ‘या’ 5 खेळाडूंनी बदलले RCBचे नशीब
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शनिवार (18 मे) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नॉकआउट सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 27 धावांनी पराभव केला. आता, 22 मे (बुधवार) रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा सामना पॉइंट टेबलमधील तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी (सनरायझर्स हैदराबाद किंवा राजस्थान रॉयल्स) होईल.

15 दिवसांपूर्वी आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. खरं तर, एकेकाळी 8 सामन्यांत फक्त एकच विजय मिळवल्यामुळे आरसीबीच्या खात्यात केवळ दोन गुण होते. यादरम्यान त्यांनी सलग सहा सामने गमावले होते. त्यामुळे पॉइंट टेबलमध्ये ते शेवटच्याच स्थानी राहतील असे वाटत होते. पण पराभवाने मनोबल खचले असताना त्यांच्या आरसीबीच्या खेळाडूंनी इतिहास रचला. त्यांच्या आश्चर्यकारक कामगिरीमध्ये पाच खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

विराट कोहली :

विराट कोहलीने आरसीबीसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात कोहली आरसीबीचा स्टार परफॉर्मर ठरला आहे. कोहलीने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक-रेट 155.60 आणि सरासरी 64.36 राहिला आहे. कोहलीने चालू हंगामात पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. सध्या तो ऑरेंज कॅप शर्यतीत आघाडीवर आहे. (IPL 2024)

कॅमेरून ग्रीन :

मागील आयपीएल हंगामात कॅमेरॉन ग्रीन हा मुंबई इंडियन्सचा (MI) भाग होता. या हंगामात, आरसीबीने त्याला ट्रेडिंग विंडोद्वारे आपल्या संघात समाविष्ट केले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ग्रीन फ्लॉप ठरला होता, पण त्यानंतर त्याने लय मिळवली. फलंदाजीसह गोलंदाजीतही तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने 12 सामन्यात 222 धावा केल्या असून 9 विकेट मिळवल्या आहेत.

फाफ डु प्लेसिस :

संघाच्या यशात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. आरसीबीचे नेतृत्व करताना फॅफ डू प्लेसिसने लक्षवेधी कामगिरी केली आहे. तो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. कर्णधारपदासह फलंदाजीतही तो चमकदार कामगिरी करत आहे. डु प्लेसिसने 14 डावात 30.07 च्या सरासरीने 420 धावा केल्या आहेत. सीएसकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डु प्लेसिसने 54 धावांची तुफानी खेळी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. (IPL 2024)

विल जॅक :

विल जॅकने आरसीबीचे नशीब फिरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जॅकला संधी मिळाली नाही. मात्र संधी मिळाल्यावर त्याने अतुलनीय कामगिरी केली. जॅकने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले, ज्यामुळे या स्पर्धेत आरसीबीला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर जॅकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 41 धावांची खेळीही खेळली. जॅक सीएसकेविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही कारण तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडला परतला आहे. आयपीएल 2024 मध्ये जॅकने आठ सामन्यांमध्ये 175.57 च्या स्ट्राइक रेटने 230 धावा केल्या.

यश दयाल :

डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने आरसीबीसाठी या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 13 सामन्यांत 8.94 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 28.13 आणि स्ट्राइक रेट 18.86 राहिला आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यातील शेवटचे षटक यश दयालने टाकले. ज्यामध्ये त्याने एमएस धोनीला बाद करून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

गेल्या 16 हंगामात आरसीबीला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. पण यावेळी संघाने ज्याप्रकारे पराभवातून पुनरागमन केले आहे, ते पाहता चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. आरसीबी आता विजेतेपदापासून तीन पावले दूर आहे. प्रथम, आरसीबीला एलिमिनेटर सामना जिंकावा लागेल, तरच त्यांना क्वालिफायर-2 सामन्यात स्थान मिळेल. जर त्यांनी क्वालिफायर-2 सामना जिंकला तर त्यांचे अंतिम सामन्यातील स्थान निश्चित होईल. (IPL 2024)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news