Indonesia Masters badminton : भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर तगडे आव्हान

Indonesia Masters badminton
: भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर तगडे आव्हान
Published on
Updated on

जकार्ता : गत आठवड्यात घरच्या मैदानावर (इंडिया ओपन) झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर, भारतीय बॅडमिंटनपटू आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 5 लाख अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या ‌‘इंडोनेशिया मास्टर्स‌’ स्पर्धेत सुधारणा करण्याच्या निर्धाराने उतरतील. मात्र, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसमोर सुरुवातीपासूनच कडवे आव्हान असणार आहे.

प्रणॉय, लक्ष्य सेनसमोर तगडे आव्हान

यापूर्वी इंडिया ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आलेला लक्ष्य सेन येथे मागील अपयशाची भरपाई करत पदक जिंकण्यासाठी निर्धाराने कोर्टवर उतरणे अपेक्षित आहे. त्याची पहिली लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहविरुद्ध होईल.

दुसरीकडे, एच. एस. प्रणॉयला पहिल्याच फेरीत मलेशियाच्या माजी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या ली झी जियाचा सामना करावा लागणार आहे.

माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला किदाम्बी श्रीकांत जपानच्या कोकी वातानाबेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तरुण मन्नेपल्लीसमोर जपानच्या युशी तानाकाचे आव्हान असेल. तसेच, अमेरिकन ओपन विजेता आयुष शेट्टीची गाठ तिसऱ्या मानांकित आणि इंडिया ओपनचा उपविजेता जोनाथन क्रिस्टीशी पडणार आहे.

महिला एकेरीत सिंधूसह युवा खेळाडूंवर भिस्त

दुखापतीतून सावरल्यानंतर हंगामाची सुरुवात करणाऱ्या पाचव्या मानांकित पी. व्ही. सिंधूची पहिली लढत जपानच्या मानामी सुइझूशी होईल. इंडिया ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने सिंधूसाठी ही स्पर्धा विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी मोठी संधी असेल. कनिष्ठ जागतिक अजिंŠयपद स्पर्धेतील ‌‘रौप्य‌’ विजेती तन्वी शर्मा जपानच्या चौथ्या मानांकित तोमोका मियाझाकीविरुद्ध खेळेल.

गेल्या आठवड्यात ऑलिम्पिक चॅम्पियन चेन यू फेईला कडवी झुंज देणाऱ्या तन्वीकडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान, युवा खेळाडू उन्नती हुडासमोर अव्वल मानांकित चेन यू फेईचे कठीण आव्हान असेल, तर मालविका बनसोड कॅनडाच्या सहाव्या मानांकित मिशेल लीविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news