IND vs AFG | भारताची विजयी सलामी; अफगाणला ७ गडी राखून नमवले

IND vs AFG |
IND vs AFG | भारताची विजयी सलामी; अफगाणला ७ गडी राखून नमवले
Published on
Updated on

धर्मशाळा; वृत्तसंस्‍था : पावसाचा व्‍यत्‍यय आलेल्‍या येथील पहिल्या वन-डे सामन्यात भारताने कर्णधार शुभमन गिलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला आणि ३ सामन्‍यांच्‍या मालिकेत विजयी सलामी दिली. रहमानुल्‍लाह गुरबाजने ५१ चेंडूंत १०२ धावा फटकावल्‍यानंतर अफगाणने २४.५ षटकांत सर्वबाद १९४ धावा केल्‍या. प्रत्‍युत्तरात भारताने २२.५ षटकांत ३ बाद १९५ धावांसह दमदार विजय संपादन केला. कर्णधार शुभमन गिलने ६६ चेंडूंत नाबाद ८४, तर के. एल. राहुलने १९ चेंडूंत नाबाद ३९ धावांसह विजयावर शिक्‍कामोर्तब करून दिले. या जोडीने चौथ्‍या गड्यासाठी ३२ चेंडूंत ५३ धावांची अभेद्य भागीदारी साकारली. पावसाच्या व्यत्ययामुळे तब्बल ४ तास १५ मिनिटांचा खेळ वाया गेल्‍याने ही लढत २५ षटकांची खेळवण्यात आली.

रोहितच्या सलामीला १६ हजार धावा

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला १६ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा यादरम्यान पार केला. या यादीत लंकेचा सनथ जयसूर्या १९,२९८ धावांसह आघाडीवर आहे. रोहितशिवाय सेहवागदेखील (१६,११९) या यादीत समाविष्ट आहे.

गुरबाजचे ४८ चेंडूंत शतक

सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने (१०२) अवघ्‍या ४८ चेंडूंतच तडाखेबंद शतक झळकावल्‍यानंतर अफगाणने पावसाने व्‍यत्‍यय आणलेल्‍या येथील पहिल्‍या वन-डे लढतीत भारताविरुद्ध २४.५ षटकांत सर्वबाद १९४ धावांपर्यंत जोरदार मजल मारली. पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. गुरबाजने वन-डे कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावले. वयाची २५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी यष्टिरक्षक म्हणून ७ शतके ठोकणारा तो क्विंटन डी कॉकनंतर (१३ शतके) जगातील दुसरा फलंदाज ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news