T20 World Cup 2026 | टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ रवाना; कट्टर प्रतिस्पर्ध्याशी होणार पहिली लढत

T20 World Cup 2026 |
T20 World Cup 2026 | टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ रवाना; कट्टर प्रतिस्पर्ध्याशी होणार पहिली लढत
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी इंग्लंड आणि वेल्ससाठी रवाना झाला. ही बहुप्रतीक्षित विश्वचषक स्पर्धा 12 जून ते 5 जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे.

अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ‘गट 1’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगला देश आणि नेदरलँड संघांचा समावेश आहे. भारताची विश्वचषक मोहीम 14 जून रोजी बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरू होईल. यानंतर संघ लीडस् येथे नेदरलँडविरुद्ध आणि मँचेस्टर येथे दक्षिण आफ्रिका व बांगला देशविरुद्ध खेळेल. 28 जून रोजी लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शेवटचा साखळी सामना होईल. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे 28 मे, 30 मे आणि 2 जून रोजी होतील.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयांंका पाटील, राधा यादव.

भारताचे साखळी फेरीतील सामने

तारीख प्रतिस्पर्धी ठिकाण

14 जून पाकिस्तान बर्मिंगहम

17 जून नेदरलँड लीडस्

21 जून द. आफ्रिका मँचेस्टर

25 जून बांगला देश मँचेस्टर

28 जून ऑस्ट्रेलिया लंडन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news