

india wtc 2025-27qualification scenario:
दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाच्या मायदेशातील कामगिरीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच आता २०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची फायनल गाठण्यातही टीम इंडिया पिछाडीवर पडताना दिसत आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघानं आधीत तीन सामन्यात पराभव पाहिला आहे. एक सामना ड्रॉ झाला असून आतापर्यंत टीम इंडियाला फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणं आता अवघड होत चाललं आहे. मात्र अजून आशा मावळलेली नाही. यासाठी टीम इंडियाला उरलेल्या १० सामन्यात अत्यंत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारतीय संघ सध्या WTC पॉईंट टेबलमध्ये मधेच कुठंतरी लटकला आहे. टीम इंडियाचे पॉईंट पर्सेंटेज हे ५४ पेक्षा थोडं जास्त आहे. WTC पॉईंट टेबलचा इतिहास पाहिला तर फायनल गाठणाऱ्या संघाचे पॉईंट पर्सेंटेज हे ६४ ते ६८ च्या दरम्यान राहिलेलं आहे.
याचा अर्थ भारताला आता आपल्या उरलेल्या सामन्यांपैकी जवळपास सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. तरच टीम इंडिया पहिल्या दोन स्थानात पोहचू शकेल. टीम इंडियाला आता एखादी चूक देखील महागात पडू शकते. यामुळं फायनल गाठणं मुश्कील होऊ शकतं.
भारत अजून किती कसोटी सामने खेळणार आहे?
दक्षिण अफ्रिकेविरूद्ध १ सामना (घरच्या मैदानावर)
श्रीलंकेविरूद्ध २ कसोटी समन्यांची मालिका (परदेशात)
न्यूझीलंडविरूद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका (परदेशात)
ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका (मायदेशात)
टीम इंडिया अजून १० कसोटी सामने खेळणार आहे. त्यांची एकूण गुणांची बेरीज ही जवळपास १२० पॉईंट्स इतकी होते. एकूण १८ सामन्यांपैकी भारताचे ८ सामने झाले आहेत.
५ सामन्यात विजय
जर भारतानं उर्वरित १० सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे फायनल पॉईंट ११२ होतील, तर पॉईंट पर्सेंटेज हे ५१.८५ टक्के होईल.
६ सामन्यात विजय
जर भारतानं ६ सामने जिंकले तर भारताचे एकूण पॉईंट १२४ होतील. अन् पॉईंट पर्सेंटेज हे ५७.४१ टक्के होईल.
७ सामन्यात विजय
जर भारतानं ७ सामने जिंकले तर भारताचे एकूण पॉईंट १३६ होतील. अन् पॉईंट पर्सेंटेज हे ६२.९६ टक्के होईल.
८ सामन्यात विजय
जर भारतानं ८ सामने जिंकले तर भारताचे एकूण पॉईंट १४८ होतील. अन् पॉईंट पर्सेंटेज हे ६८.५२ टक्के होईल.
९ सामन्यात विजय
जर भारतानं ९ सामने जिंकले तर भारताचे एकूण पॉईंट १६० होतील. अन् पॉईंट पर्सेंटेज हे ७४.०७ टक्के होईल.
१० सामन्यात विजय
जर भारतानं उर्वरित सर्व १० सामने जिंकले तर भारताचे एकूण पॉईंट १७२ होतील. अन् पॉईंट पर्सेंटेज हे ७९.६३ टक्के होईल.
भारतीय संघाला तर wtc फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल तर भारतीय संघाला किमान १० पैकी ८ सामने जिंकावे लागणार आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रत्येक सायकलचे विजेते, अव्वल दोन संघ आणि त्यांचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट (Percentage of Points - PCT)
२०१९-२१ सायकल (विजेता: न्यूझीलंड)
भारत (क्रमंक 1): 72.2%
न्यूझीलंड (क्रमंक 2): 70.0%
२०२१-२३ सायकल (विजेता: ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया (क्रमंक 1): 66.7%
भारत (क्रमंक 2): 58.8%
२०२३-२५ सायकल (विजेता: दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिका (क्रमंक 1): 69.44%
ऑस्ट्रेलिया (क्रमंक 2): 67.54%
भारताला जर WTC फायनल गाठायची असेल तर त्यांचे पॉईंट पर्सेंटेज हे जवळपास ६८ टक्क्यांच्या आसपास असायला हवं.