IND W vs SL W : भारतीय गोलंदाजांचा कहर, श्रीलंकेचा महिला संघ अडचणीत; 4 विकेट पडल्या

IND W vs SL W

पुढारी ऑनलाईन डेस्क

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (India W vs Sri Lanka W T20 World Cup)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

श्रीलंकेला चौथा धक्का

43 धावांच्या स्कोअरवर अनुष्का संजीवनीच्या रूपाने श्रीलंकेला चौथा धक्का बसला. आशा शोभनाने तिला रिचा घोषकडे झेलबाद केले. ती 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

श्रीलंकेची खराब सुरुवात

श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेली विश्मी पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. ती खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचवेळी चमरी अटापट्टूलाही एक धाव करता आली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेली फलंदाज हर्षिता समरविक्रमा केवळ तीन धावा करून माघारी परतली.

भारताने 20 षटकात 172 धावा केल्या

भारतीय संघाने श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्ध 20 षटकांत 3 गडी गमावून 172 धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी अर्धशतके झळकावली.

भारताला तिसरा धक्का

कांचनाने भारताला तिसरा धक्का दिला. तिने जेमिमाह रॉड्रिग्जला बाद केले. जेमिमाहला फक्त 16 धावा करता आल्या. रिचा घोष पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली आहे.

भारताला दुसरा धक्का

भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्माही पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला चामरी अटापट्टूने गुणरत्नेच्या हाती झेलबाद केले. शेफालीने 40 चेंडूत 43 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का 98 धावांवर बसला. तिला कांचना आणि अटापट्टू यांनी धावबाद केले. स्मृतीने 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली. हरमनप्रीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली.

मानधना आणि शेफालीची दमदार खेळी

शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी श्रीलंकेविरुद्ध दमदार प्रदर्शन केले आहे. दोघांमध्ये 70 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 78 आहे. श्रीलंका पहिल्या विकेटच्या शोधात आहे.

पॉवरप्लेनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 41

भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने पॉवरप्लेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. शेफाली आणि स्मृती दमदार फॉर्ममध्ये दिसत आहेत. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 41 झाली आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

भारत : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

श्रीलंका : विशामी गुणरत्ने, चमरी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधिनी, इनोका रणवेरा.

logo
Pudhari News
pudhari.news