India vs Zimbabwe 1st T20I Live |गिल-सुंदरची झुंज अपयशी, झिम्बाब्वेचा भारतावर 13 धावांनी विजय

भारताचा झिम्बाब्वे विरुद्ध पहिला टी-२० सामना
Zimbabwe's thrilling win over India
झिम्बाब्वेचा भारतावर रोमहर्षक विजयZimbabwe Cricket 'X' Handle
Published on
Updated on

भारताचा झिम्बाबेकडून 13 धावांनी पराभव

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला आहे . या सामन्यात शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशिवाय एकही भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करु शकला नाही.

भारताला नववा झटका

भारताने 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नववा खेळाडू गमावला आहे. मुकेश कुमार शून्यावर बाद झाला. त्याला सिकंदर रझाने बोल्ड केले आहे. सिकंदर रजाची ही सामन्यातील तिसरा बळी आहे.

भारताला आठवा धक्का

आवेश खानच्या रुपामध्ये भारताला आठवा धक्का बसला आहे. चांगली फटकेबाजी करत असलेल्या खानला वेलिंगटनने त्रिफळाचीत केले आहे. आवेशने 12 चेंडूमध्ये तीन चौकार मारत 16 धावा केल्या आहेत

रवी बिश्नोई नऊ धावा करून बाद

भारताला 61 धावांच्या स्कोअरवर सातवा धक्का बसला. सिकंदर रझाने रवी बिश्नोईला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. आवेश खान नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

भारताला सहावा धक्का

शुभमन गिलच्या रूपाने भारताला सहावा धक्का बसला. त्याला कर्णधार सिकंदर रझाने बोल्ड केले. त्याने 29 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. रवी बिश्नोई आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर उपस्थित आहेत. 12 षटकांनंतर भारताची धावसंख्या 54/6 आहे.

भारताचा अर्धा संघ पॅवेलियनमध्ये

ध्रुव जुरेलच्या रुपात भारताला पाचवा धक्का बसला आहे. जुरेलने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 14 चेंडूत 7 धावा केल्या आहेत. दहाव्या षटकात जोंगवेने त्याला झेलबाद केले आहे. आता मैदानावर शुभमन गिलची साथ द्यायला वॉशिग्टन सुंदर आला आहे.

रिंकूला सिंग खाते न उघडता बाद

भारताला 5 व्या षटकातच चौथा धक्का बसला आहे. तेंडाई चताराविरुद्ध पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंग झेलबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. ध्रुव जुरेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. हा त्याचा पदार्पणाचा सामना आहे.

रियान पराग स्वस्तात परतला 

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात रियान पराग अवघ्या दोन धावा करून बाद झाला. त्याला चताराने बेनेट करवी झेलबाद बाद केले. रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याच्यासोबत क्रिजवर कर्णधार शुभमन गिल 12 धावांवर खेळत आहे.

भारताला दुसरा झटका

भारताला दुसरा धक्का 15 धावांवर बसला. रुतुराज गायकवाडला मुजारबानीने कायच्या हाती झेलबाद केले. त्याला केवळ सात धावा करता आल्या. रियान पराग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल क्रीजवर उपस्थित आहे.

सुरुवातीलाच भारताला पहिला धक्का

सलामीला आलेला अभिषेक शर्मा पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुन्यावर झेलबाद झाला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड खेळत आहेत.

बिश्नोईने घेतल्या ४ विकेट्स

वॉशिंग्टन सुंदरने झिम्बाब्वेला १५ व्या षटकात पाठोपाठ दोन धक्के दिले. वॉशिंग्टनने १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डायन मायर्सला झेलबाद केले. तर वॉशिंग्टनच्या तिसऱ्या चेंडूवर मसाकादझा यष्टिचीत झाला. त्यानंतर १६ व्या षटकांत जोंगवेला पायचीत केले. १६ व्या षटकांत बिश्नोईने ब्लेसिंग मुजराबानीला आउट केले. यामुळे झिम्बाब्वे १६ षटकांत झिम्बाब्वेच्या ९ बाद ९० धावा झाल्या होत्या.

झिम्बाब्वे पाठोपाठ धक्के

१२ व्या षटकातील आवेश खानच्या पाचव्या चेंडूवर रजा झेलबाद झाला. तर आवेश खानच्या अखेरच्या चेंडूवर जोनाथन कॅम्पबेलला धावबाद करण्यात आले. यामुळे १२ षटकांत झिम्बाब्वेची अवस्था ५ बाद ७४ धावा अशी होती.

झिम्बाब्वेला तिसरा धक्का

आठव्या षटकात रवी विश्नोईने झिम्बाब्वेला तिसरा धक्का दिला. त्याने मधेवेरेला माघारी पाठवले. त्याने २१ धावा केल्या. झिम्बाब्वेने १० षटकांत ३ बाद ६९ धावा केल्या होत्या.

झिम्बाब्वेला दुसरा धक्का

रवी बिश्नोईने सहाव्या षटकात झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला. बिश्नोईच्या गुगलीवर बेनेटने ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण तो बोल्ड आउट झाला. यामुळे ७ षटकांत २ बाद ४९ अशी झिम्बाब्वेची अवस्था झाली.

झिम्बाब्वेच्या ५ षटकांत १ बाद ४० धावा

झिम्बाब्वेचे वेस्ली माधेवेरे आणि ब्रायन बेनेट तुफान फटकेबाजी करत आहे. झिम्बाब्वेच्या पहिल्या ५ षटकांत १ बाद ४० धावा. पाचव्या षटकात आवेश खानने झेल सोडला. यामुळे खलिल अहमदच्या चेंडूवर बेनेटला जीवदान मिळाले.

झिम्बाब्वेला पहिला धक्का

भारताला पहिले यश. इनोसंट कैया याला मुकेश कुमारने आऊट केले. दुसऱ्या षटकाच्या मुकेश कुमारच्या पहिल्याच चेंडूवर कैयाला आऊट करुन शून्यावर माघारी पाठवले.

अशी आहे भारताची प्लेईंग XI

शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा (पदार्पण), ऋतुराज गायकवाड, रियान पराग (पदार्पण), रिंकू सिंग, ध्रूव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.

India vs Zimbabwe 1st T20I BCCI
भारताचा प्लेईंग XI संघ. BCCI

टॉस जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारताने आज टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे दुपारी साडेचार वाजल्यापासून झाला सुरु होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने भारतासमोर 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, भारतीय संघाला 19.5 षटकांत 10 विकेट्सवर केवळ 102 धावा करता आल्या. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतावर 13 धावांनी विजय मिळवला आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news