India vs USA T20 World Cup: टी-20 विश्वचषक मोहिमेला आज सुरुवात; अमेरिकेविरुद्ध भारत ‘फेव्हरेट’

रोहित–कोहलीनंतरही भारत मजबूत; सूर्यकुमार, इशान-अभिषेक जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
India vs USA T20 World Cup
India vs USA T20 World CupPudhari
Published on
Updated on

मुंबई : टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणारा बलाढ्य भारतीय संघ आज (शनिवार दि. 7) अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सलामीच्या लढतीत ‌‘फेव्हरेट‌’ असलेल्या भारतीय खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे नसेल. उलटपक्षी, अमेरिकेचा संघ अगदीच नवखा असल्याने भारतीय संघ सहज बाजी मारणार का, याकडेच लक्ष असेल. ही लढत सायंकाळी 7 पासून खेळवली जाईल.

India vs USA T20 World Cup
Panvel Mayor Election: पनवेल पालिकेवर भाजपची पाटीलकी; आगरी समाजाला संधी, महापौरपदी नितीन पाटील, तर उपमहापौरसाठी प्रमिला पाटील यांना उमेदवारी

2024 च्या विश्वविजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली असली, तरी भारतीय संघाची ताकद यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यानंतर भारताने सलग 9 मालिका जिंकत आणि आशिया चषकावर नाव कोरत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

India vs USA T20 World Cup
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत संधी

सूर्यकुमारचे पुनरागमन आणि‌ ‘इशान-अभिषेक‌’ जोडीची ताकद

2025 मधील खराब फॉर्म मागे सारून कर्णधार सूर्यकुमार यादवने फॉर्मात पुनरागमन केल्याने भारतीय संघ अधिक समतोल झाला आहे. यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनचे स्फोटक पुनरागमन आणि त्याला मिळणारी युवा अभिषेक शर्माची साथ भारतासाठी जमेची बाजू ठरेल. या जोडीची आक्रमक फलंदाजी प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्यासाठी सज्ज आहे. मधल्या फळीत तिलक वर्माचा संयम आणि हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व शिवम दुबे यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंचा ताफा भारतीय फलंदाजीला अभेद्य बनवते. ‌‘फिनिशर‌’ म्हणून रिंकू सिंगवर महत्त्वाची जबाबदारी असेल.

India vs USA T20 World Cup
Navi Mumbai Crime Report: नवी मुंबईत गुन्हे वाढले, पण उकल 80 टक्क्यांवर; बेलापूरमध्ये अत्याधुनिक CCTV कमांड सेंटर उभारणार

बुमराहच्या साथीला अर्शदीप

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह हा भारताचा मुख्य आधारस्तंभ असून, त्याला अर्शदीप सिंगची चांगली साथ मिळेल. फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे असेल. मात्र, मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला असून सिराजची संघात वर्णी लागली आहे.

India vs USA T20 World Cup
Vinod Tawde Rajya Sabha: राज्यसभा वाटेवर विनोद तावडे? भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये नाव चर्चेत

संघ अमेरिकेचा, भिस्त मात्र मुंबईकर खेळाडूंवर!

विशेष म्हणजे, अमेरिकेच्या संघात सौरभ नेत्रावळकर, हरमीत सिंग आणि शुभम रांजणे हे खेळाडू आहेत, जे यापूर्वी सूर्यकुमारसोबत मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होते. वानखेडेच्या खेळपट्टीचा आणि परिस्थितीचा त्यांना असलेला अनुभव अमेरिकेसाठी फायदेशीर ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत करून आपली ताकद दाखवून दिली आहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला कडवी झुंज दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news