

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 1st T20 : पहिल्या T20 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 203 धावांचे लक्ष्य दिले आहे. डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 8 गडी गमावून 202 धावा केल्या. संघाकडून संजू सॅमसनने वादळी शतक ठोअले. तो 107 धावा करून बाद झाला. त्याचे हे सलग दुसऱ्या टी-20 मध्ये शतक झळकले आहे.
भारताकडून तिलक वर्माने 33 आणि सूर्यकुमार यादवने 21 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कुत्झीने 3 बळी घेतले. मार्को जॅन्सन, केशव महाराज, एन पीटर आणि पॅट्रिक क्रुगर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. एक फलंदाज धावबाद झाला.
भारतीय संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका संघ
रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमजी पीटर.