India vs Pakistan: विजय मिळवूनही मैदानात राडा! कुलदीप यादववर हार्दिक पंड्या भडकला, सूर्यानेही झापलं; नेमकं काय घडलं? Video

Hardik Pandya angry video IND vs PAK T20 World Cup 2026: आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यानंतरचा हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
India vs Pakistan
India vs Pakistanfile photo
Published on
Updated on

India vs Pakistan Hardik Pandya angry video T20 World Cup 2026:

नवी दिल्ली : आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पाकिस्तानचा केवळ पराभवच केला नाही, तर सुपर-8 मधील आपले स्थानही जवळपास निश्चित केले आहे. 61 धावांनी मिळालेल्या या शानदार विजयादरम्यान मैदानावर असा एक प्रसंग घडला, ज्यामुळे काही काळ भारतीय खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

India vs Pakistan
IND vs PAK : कोलंबोत टीम इंडियाचा 'रुद्राभिषेक'; महाशिवरात्रीला पाकिस्तान विरुद्ध विजयाचा महातांडव!

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावांचा मजबूत धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव दबावाखाली राहिला आणि त्यांचा संपूर्ण संघ 18 षटकांतच बाद झाला. या मोठ्या विजयानंतरही सामन्यादरम्यान एक असा क्षण आला, ज्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण काही काळासाठी तापवले.

नेमकं काय झालं होतं?

सामन्यादरम्यान कुलदीप यादवने बाउंड्री लाईनवर शाहीन आफ्रिदीचा एक सोपा झेल सोडला. 18 व्या षटकात हार्दिक पंड्याच्या दुसऱ्या चेंडूवर शाहीनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू हवेत उंच गेला होता. कुलदीप चेंडूच्या खाली व्यवस्थित उभा होता, पण शेवटच्या क्षणी एकाग्रता कमी झाल्यामुळे चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि थेट सीमारेषेबाहेर पडला, ज्यामुळे फलंदाजाला सहा धावा मिळाल्या.

याच्या बरोबर आधीच्या चेंडूवर यष्टीरक्षक इशान किशननेही झेल सोडला होता. लागोपाठ दोन संधी हुकल्यामुळे गोलंदाज हार्दिक पंड्या संतापलेला दिसला. सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू ड्रेसिंग रूमकडे परतत होते, तेव्हा हार्दिक कुलदीप यादवशी कडक शब्दात बोलताना दिसला. कर्णधार सूर्यकुमार यादवही कुलदीपवर चिडलेला पाहायला मिळाला. त्या वेळी तिलक वर्माच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, तर रिंकू सिंह वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसला.

हार्दिकच्या रागाचे कारण

हार्दिक पंड्याच्या संतापाचे कारण स्पष्ट होते. जर कुलदीप यादवने तो झेल पकडला असता, तर सामना त्याच क्षणी संपला असता. त्याऐवजी हार्दिकच्या खात्यात 6 धावा जमा झाल्या आणि त्याला अतिरिक्त चेंडू टाकावे लागले.

मात्र, या घटनेनंतर पंड्याने स्वतःला सावरले आणि 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उस्मान तारिकची विकेट घेऊन भारताचा विजय निश्चित केला. त्याच्या गोलंदाजीने हे सिद्ध केले की, दडपणाखालीही त्याच्यात सामना संपवण्याची क्षमता आहे. भारताचा हा विजय अनेक अर्थांनी खास ठरला. एकीकडे संघाने दबावात चांगली कामगिरी केली, तर दुसरीकडे विजयानंतरही खेळाडू छोट्या चुकांबाबत किती गंभीर असतात हे देखील दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news