India vs Pakistan hockey : टीम इंडियाचे पाकिस्तान संघासोबत हँडशेक! BCCI च्या ट्रेंडला दाखवली केराची टोपली

India vs Pakistan hockey
India vs Pakistan hockeyPudhari Photo
Published on
Updated on

India vs Pakistan hockey :

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे ज्युनिअर संघ एकमेकांना भिडले. ऑपरेशन सिंदूरच्या आणि बीसीसीआयने नो हँड शेकच्या पवित्र्यानंतर या सामन्याकडं सर्वांच लक्ष होतं. मात्र राष्ट्रगीतानंतर आणि सामन्यानंतरही दोन्ही संघातील खेळाडूंनी हँडशेक आणि हाय-फाय देत एक नवा ट्रेंड सेट केला. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामना ३-३ असा बरोबरीत संपला.

India vs Pakistan hockey
Rohit Sharma : रोहित शर्माचं ट्रान्सफॉर्मेशन... २०११ च्या वर्ल्डकपशी आहे कनेक्शन

सुल्तान जोहोर कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या संघात सामना म्हटलं की काही ना काही ड्रामा होतोच. मात्र या सामन्यावेळी सामान्य चित्र दिसलं. सामन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीतानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना हाय फाय देत खिलाडूवृत्ती जपली. त्यानंतर अटी-तटीच्या सामन्यानंतरही दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केलं.

काही आठवड्यापूर्वीच झालेल्या आशिया कप सामन्यात भारत पाकिस्तान तीनवेळा एकमेकांना भिडले. मात्र त्यावेळी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं होतं. यावरून बराच वाद झाला होता. हा वाद मैदानावर देखील दिसला.

हँडशेकचा वाद फक्त सामन्यापुरता मर्यादित राहिला नाही तर तो बक्षीस वितरण सोहळ्यापर्यंत पोहचला. मोहसीन नक्वी पाकिस्तानी मंत्री जे आशिया क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष देखील आहेत. त्याच्या हस्ते भारतीय संघानं आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन हॉटेलवर गेले. त्यामुळं भारतीय संघाला विजेत्या ट्रॉफीविनाच भारतात परतावं लागलं होतं.

India vs Pakistan hockey
India vs Australia: मिशन ऑस्ट्रेलिया! कोहली-रोहितसह टीम इंडिया रवाना; पाहा Video

मात्र सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेत चित्र वेगळं दिसलं. पाकिस्तान हॉकी फेडरेशननं आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना भारतीय खेळाडूंसोबत मैदानावरील कोणताही वाद टाळावा अशी सूचना दिली होती. त्यांना फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news