India Vs Pakistan Records: भारत-पाक 'सुवर्ण' सामन्यात टीम इंडियानं केले तब्बल 9 रेकॉर्ड; अभिषेक, तिलकची धुलाई

भारताने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात २०० धावांचा आकडा पार करत एक मोठा विक्रम केला.
India Vs Pakistan Records
India Vs Pakistan Recordspudhari
Published on: 
Updated on: 

India Vs Pakistan Records Asian Games 2026: एशियन्स गेम्स २०२६ च्या पुरूष क्रिकेट सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. भारताने २० षटकात ६ बाद २११ धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली. अभिषेकने २८ चेंडूत ६१ तर तिलक वर्माने २२ चेंडूत ५१ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि इशान किशन यांनी देखील महत्वाचे योगदान दिलं.

भारताने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात २०० धावांचा आकडा पार करत एक मोठा विक्रम केला. त्याचबरोबर या सामन्यात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी मिळून असे १० विक्रम केले आहेत.

1 भारत-पाकिस्तान T20I मध्ये पहिली पारीतील सर्वोच्च धावसंख्या

२११/६ - भारत, निशिं, २०२६ (सर्वोच्च धावसंख्या)

१९२/५ - भारत, अहमदाबाद, २०१२ (सामना जिंकला)

१८१/७ - भारत, दुबई, २०२२ (सामना गमावला)

१७५/७ - भारत, कोलंबो आरपीएस, २०२६ (सामना जिंकला)

१७१/५ - पाकिस्तान, दुबई, २०२५ (सामना गमावला)

१५९/८ - पाकिस्तान, मेलबर्न, २०२२ (सामना गमावला)

2 एका कॅलेंडर इयरमध्ये १०००+ टी-२० धावा करणारे फलंदाज

इशान किशन पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये १००० धावा करणारा दुसरा भारतीय आणि एकूण ७ वा खेळाडू ठरला आहे.

१४७२ - करनबीर सिंह (ऑस्ट्रिया) - २०२५ (स्ट्राइक रेट: १७४.२)

१३२६ - मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) - २०२१ (स्ट्राइक रेट: १३५.०३)

१२५१ - फियाज अहमद (बहरीन) - २०२५ (स्ट्राइक रेट: १३३.०८)

११६४ - सूर्यकुमार यादव (भारत) - २०२२ (स्ट्राइक रेट: १८७.४३)

१०३७ - प्रशांत कुरुप (बहरीन) - २०२५ (स्ट्राइक रेट: ११४.४५)

१००८ - बिलाल झल्मई (ऑस्ट्रिया) - २०२५ (स्ट्राइक रेट: १५५.०७)

१००५ - इशान किशन (भारत) - २०२६ (स्ट्राइक रेट: १६९.४७)

3 भारत-पाकिस्तान T20I एकाच डावात सर्वाधिक षटकार

अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत युवराज सिंहची बरोबरी केली आहे.

७ षटकार - युवराज सिंह, अहमदाबाद, २०१२

७ षटकार - अभिषेक शर्मा, निशिं, २०२६

५ षटकार - अभिषेक शर्मा, दुबई, २०२५

4 एकूण षटकार:

अभिषेक शर्माचे पाकिस्तानविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये एकूण १४ षटकार झाले असून, त्याने विराट कोहलीचे ११ षटकारांचे रेकॉर्ड मागे टाकले आहे.

5 एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक टी-२० षटकार मारणारे फलंदाज

अभिषेक शर्माने २०२६ मध्ये १०० षटकार मारण्याचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय असून त्याने सलग दुसऱ्या वर्षी हा पराक्रम केला आहे (गेल्या वर्षी १०८ षटकार मारले होते).

१०८ षटकार - अभिषेक शर्मा (२०२५)

१०४ षटकार - अभिषेक शर्मा (२०२६)

९० षटकार - वैभव सूर्यवंशी (२०२६)

८७ षटकार - अभिषेक शर्मा (२०२४)

८५ षटकार - सूर्यकुमार यादव (२०२२)

6 १०० टी-२० षटकारांसाठी सर्वात कमी चेंडू:

५८९ चेंडू - आंद्रे रसेल (२०१९)

६५१ चेंडू - अभिषेक शर्मा (२०२६)

६५३ चेंडू - डी ब्रेविस (२०२५)

७२४ चेंडू - क्रिस गेल (२०१६)

७२८ चेंडू - करनबीर सिंह (२०२५)

7 सर्वोच्च पॉवरप्ले स्कोर

पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात भारताचा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोर ८१/२ झाला आहे. यापूर्वी दुबईत आशिया कप २०२५ सुपर फोर सामन्यात ६९/० हा उच्चांक होता, जिथे अभिषेकने २४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

8 सर्वात महागडे षटक

आजच्या सामन्यात साद मसूदने टाकलेले दुसरे षटक भारत-पाकिस्तान टी-२० मधील सर्वात महागडे षटक (२४ धावा) ठरले. यापूर्वी २०१२ मध्ये अहमदाबाद येथे सईद अजमलच्या षटकात (पारीचे १९ वे षटक) युवराज सिंहने सलग तीन षटकार मारत २२ धावा दिल्या होत्या.

9 वेगवान अर्धशतक

तिलक वर्माने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २१ चेंडू घेतले. पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये भारतासाठी हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे, तर पहिल्या क्रमांकावर याच सामन्यात अभिषेक शर्माचे २० चेंडूंचे अर्धशतक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news