जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीतून बाहेर?

IND vs NZ Mumbai Test : ‘राणा’ची होणार प्लेईंग 11मध्ये एन्ट्री?
IND vs NZ Test Series Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराहFile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ Mumbai Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेत सलग दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आल्याचे वृत्त अलीकडेच आले होते. संघात एका गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. पण भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

या सामन्याच्या एक दिवस आधी जसप्रीत बुमराहबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, टीम इंडिया मुंबई कसोटीत बुमराहला विश्रांती देणार आहे. बुधवारी, 30 ऑक्टोबर रोजी तो अहमदाबादमधील त्याच्या घरी गेला आहे. अशा स्थितीत तो मुंबई कसोटी खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत भारतीय संघ बुमराहशिवाय मैदानात उतरेल का? बुमराहच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालिकेत बुमराहची कामगिरी कशी आहे?

वर्क-लोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहची कामगिरी काही खास झालेली नाही. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 19 षटके टाकली आणि 7 मेडन षटकांसह 41 धावांत 1 बळी घेतला. तर दुसऱ्या डावात त्याने 8 षटके टाकली आणि 29 धावांत 2 बळी घेतले. बुमराहला दुसऱ्या कसोटीत एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने पहिल्या डावात 8 आणि दुसऱ्या डावात 6 षटके टाकली.

नुकतीच बातमी समोर आली आहे की 22 वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील करण्यात आले आहे. तो मुंबई कसोटीत पदार्पण करू शकतो. पण भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी सामन्यापूर्वी खुलासा केला आहे. ‘संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. हर्षित राणाला संघात स्थान दिलेले नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

हर्षित राणा हा एक उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे. त्याला भविष्यातील स्टार म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या 18 सदस्यीय संघातही त्याला स्थान मिळाले आहे. पुणे कसोटीतील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर हर्षित राणाला संघात सामील करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.

रणजी ट्रॉफीत कहर

हर्षित राणा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळत आहे. अलीकडेच दिल्लीने आसामचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात हर्षित राणाने दिल्ली संघाकडून चांगली कामगिरी केली. हर्षित राणाने पहिल्या डावात 5 फलंदाज बाद केले. तर दुसऱ्या डावात 2 बळी घेतले. याशिवाय त्याने बॅटने चमत्कार केला आणि 59 धावांची खेळीही खेळली.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news