भारत-न्यूझीलंड यांच्यातील बेंगळूरू कसोटी रद्द होणार? सामन्यावर आले मोठे संकट

IND vs NZ Test Series : भारतीय हवामान खात्याने दिला इशारा
India vs New Zealand Test Series
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी येथे खेळवला जाणार आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs New Zealand Test Series : भारतीय संघाने अलीकडेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप केला. आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपला दावा आणखी मजबूत करण्यावर रोहितसेनेची नजर असेल. टीम इंडिया सध्या WTC पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरला बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी येथे खेळवला जाणार आहे.

पाऊस करू शकतो खेळ खराब

बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबरला पावस पडण्याची मोठी शक्यता आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, पहिल्या कसोटीच्या एक दिवस आधी, 15 ऑक्टोबरला भारतीय संघाचे सराव सत्र रद्द करावे लागले. हे सत्र सकाळी 9.30 वाजता सुरू होणार होते, पण मुसळधार पावसाने अडथळा आणला. त्यामुळे तासभरासाठी सराव सत्र थांबण्यात आले. मात्र पाऊस सुरूच राहिल्याने पुढचे संपूर्ण सत्र रद्द करण्यात आले.

भारतीय हवामान खात्याने बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा कसोटी सामन्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाची 70% ते 90% शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारेही वाहू शकतात आणि आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. बेंगळुरूच्या काही भागांसह कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी बंगळुरूमध्ये पाऊस पडला. ज्यामुळे चिन्नास्वामी मैदान कव्हर करण्यात आले. अशा स्थितीत सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांचा खेळ जवळपास रद्द करण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पाऊस असाच सुरू राहिल्यास हा कसोटी सामनाच रद्द करण्यात येऊ शकतो.

भारतीय संघाचा वरचष्मा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा आहे. आकडेवारी पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने झाले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 22 आणि न्यूझीलंडने 13 कसोटी जिंकल्या आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाची भारतीय भूमीवर परिस्थिती बिकट राहिली आहे. न्यूझीलंड संघाला भारतीय भूमीवर आतापर्यंत केवळ दोनच कसोटी जिंकता आल्या आहेत.

कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ :

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज , आकाश दिवा.

न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​केन विल्यमसन, मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साऊदी, मॅट हेन्री, जेकब डफी, अजजाब पटेल, विल्यम ओ'रुर्के.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news