U19 World Cup Final : भारत दीडशे पार; विजयासाठी ३८ धावांची गरज

U19 World Cup Final : भारत दीडशे पार; विजयासाठी ३८ धावांची गरज

पुढारी ऑनलाईन डेस्क : U19 World Cup Final : इंग्लंड संघाने दिलेल्या १९० धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने ३०.१ षटकात ४ खेळाडुंच्या मोबदल्यात १०० धावा बनविल्या आहेत. उपकर्णधार शेख रशिद याने केलेल्या ५० धावांच्या मदतीने भारतीय संघ सध्या विजया समिप पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला हरनूर सिंह २० (४६), यश धुल १७ (३२) यांनी मोलाची साथ दिली. सध्या खेळपट्टीवर निशांत सिंधु व राज बावा हे खेळत आहेत. U19 World Cup Final)

भारतीय संघाने १९ व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्या आधी अठराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चांगली फलंदाजी करत असणाऱ्या हरनूर सिंह याची विकेट घेण्यात इंग्लंडच्या संघास यश आले. संघाची धावसंख्या ४९ असताना हरनूर सिंह बाद झाला. त्याने ४६ चेंडू २१ धावांची खेळी केली. ( U19 World Cup Final)

पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला 190 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने सावध सुरुवात करत १४ षटकात १ बाद ४० धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर हरनूर सिंह २० धावांवर तसेच शेख रशिद १५ धावांवर खेळत आहेत. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवर अंगक्रिश रघुवशी हा पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र इतर दोघांनी सावध व जबाबदारीने खेळ करत मंदगतीने धावा करत गेले. ( U19 World Cup Final)

तत्पुर्वी, अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 44.5 बाद 189 धावांवर सर्वबाद झाला. जेम्स रेव्हने सर्वाधिक 95 धावा केल्या. ( U19 World Cup Final)

भारताकडून राज बावाने 5 आणि रवी कुमारने 4 बळी घेतले. तर कौशल तांबेला 1 विकेट मिळाली. इंग्लंड संघाने एकवेळ 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर रेव्ह आणि जेम्स सेल्स (34) यांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात रवी कुमारने जेकब बेथेलला (2) LBW बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात रवीने कर्णधार टॉम पर्स्टला (0) क्लीन बोल्ड करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर जॉर्ज थॉमसला (27) राज बावाने बाद केले. त्यानंतर पुन्हा राज बावाने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने विल्यम लक्सटनला (4) दिनेश बानाकडे झेल देण्यास भाग पाडले. बावाने पुढच्याच चेंडूवर जॉर्ज बेललाही (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दोन षटकांनंतर बावाने रायन अहमदला (10) स्लिपमध्ये झेलबाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर कौशल ताबेनने अॅलेक्स हॉर्टनला (10) कर्णधार यश धुलकरवी झेलबाद केले.

यानंतर जेम्स रेव्ह आणि जेम्स सेल्स यांनी शानदार भागीदारी केली. ही भागीदारी रवी कुमारने 44व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रेव्हला बाद करून मोडली. त्याच षटकात त्याने थॉमस स्पिनवॉललाही (0) बाद केले. 45व्या षटकात राज बावाने जोशुआ बाउडेनला (1) बाद करून इंग्लंडचा डाव 189 धावांत संपुष्टात आणला.

भारताचा संघ :

आंगकृष्ण रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (विकेटकीपर), राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार.

इंग्लंडचा संघ :

जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम पर्स्ट (कर्णधार), जेम्स रेव्ह, विल्यम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन (विकेटकीपर), जेम्स सेल्स, थॉमस ऍस्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news