India vs England ODI squad 2026 : विराट कोहली- बुमराहचे पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराजला स्थान नाही, हर्षित राणाला संधी
India vs England ODI squad 2026
India vs England ODI squad 2026 Pudhari
Published on
Updated on

India vs England ODI squad 2026 : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला दुखापतीमुळे मुकल्यानंतर, आगामी इंग्लंड दौऱ्यातील वन-डे (ODI) मालिकेसाठी विराट कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज (दि.२१) संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यात १४ जुलै (एजबॅस्टन), १६ जुलै (सोफिया गार्डन्स) आणि १९ जुलै (लॉर्ड्स) रोजी तीन वन-डे सामने खेळवले जाणार आहेत.

जसप्रीत बुमराहचेही वन-डे संघात पुनरागमन

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही वन-डे संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयच्या 'वर्कलोड मॅनेजमेंट'चा भाग म्हणून त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.

कोहलीला झाली होती दुखापत

आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या फायनल दरम्यान कोहलीच्या पायाचे स्नायू दुखावले (Hamstring Injury) होते, ज्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वन-डे मालिकेतून बाहेर पडावे लागले होते.

यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराजला स्थान नाही

ऑलराउंडर अक्षर पटेलने देखील अफगाणिस्तान मालिकेनंतर वन-डे संघात पुनरागमन केले आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळालेले नाही.गुरनूर ब्रारने संघात आपले स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, प्रिन्स यादवला वगळण्यात आले असून हर्षित राणाचे संघात पुनरागमन झाले आहे.

वरुण चक्रवर्ती मुकणार आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला

आयपीएल २०२६ दरम्यान पायाला झालेल्या दुखापतीतून वरुण चक्रवर्ती अजून पूर्णपणे सावरलेला नाही (तो रिकव्हरीच्या अंतिम टप्प्यात आहे), त्यामुळे तो आयर्लंडविरुद्धच्या टी-२० (T20I) मालिकेला मुकणार आहे.

भारताचा वन-डे संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के. एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.

आयर्लंड टी-२० मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, टिळक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिद्ध कृष्णा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news