Yashasvi Jaiswal Record : यशस्वी जैस्वालचा धमाका, इंग्लंडच्या जो रूटला टाकले मागे

Yashasvi Jaiswal Record
यशस्वी जैस्वालTwitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal Record : भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारपासून (19 सप्टेंबर) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर पहिली कसोटी खेळवली जात आहे. ज्यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला आणि भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली हे तीन फलंदाजांनी स्वस्तात माघारी धाडले. एकामागोमाग एक धक्के बसल्याने टीम इंडिया बॅकफुटवर गेली. अशा पडझडीत यशस्वी जैस्वालने एका टोक सांभळले. तो धावा काढत राहिला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

यशस्वीची खेळी आणि भागीदारी कशी होती?

यशस्वीने 118 चेंडूंचा सामना करत 56 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 9 चौकार आले. एकवेळ भारताचे 3 फलंदाज अवघ्या 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. येथून यशस्वीने पंतसोबत 99 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. पंत बाद झाल्यानंतर त्याने केएल राहुलसोबत 48 धावा जोडल्या. यशस्वी मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण नाहिद राणाने त्याला बाद केले.

पहिल्या 10 कसोटीत सर्वाधिक 50+ धावा करणारे भारतीय फलंदाज

पहिल्या 10 कसोटींमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये यशस्वी आता संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 8 वेळा अशी कामगिरी केली आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपन रमेश याने याआधी 8 वेळा पहिल्या 10 कसोटीत 50+ धावा केल्या होत्या. यशस्वीकडे अजून एक डाव आहे आणि तो सुनील गावस्कर यांची बरोबरी करू शकतो. पहिल्या 10 कसोटींमध्ये गावस्कर यांनी 9 वेळा 50+ धावा केल्या होत्या.

2024 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. तो 2024 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs BAN 1st Test) त्याने 56 धावांची झुंजार फलंदाजी करताना ही कामगिरी केली. जैस्वालने श्रीलंकेच्या कमिंदू मेंडिसला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी आहे. त्याने 2024 मध्ये आतापर्यंत 11 सामन्यात सर्वाधिक 986 धावा केल्या आहेत. तर जैस्वालने 7 सामन्यांच्या 12 डावात 72.36 च्या सरासरीने 796 धावा केल्या आहेत. श्रीलंकेच्या कमिंदू मेंडिसने 2024 मध्ये आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये 748 धावा केल्या आहेत.

2024 मध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा

त्याच वेळी, जैस्वाल हा 2024 मध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या मागे शुभमन गिल आहे. गिलने 2024 मध्ये आतापर्यंत कसोटीत 498 धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्माने 461 धावा केल्या आहेत.

यशस्वीने इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजांना मागे टाकले

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत यशस्वी दुसऱ्या क्रमांकावर पोहचला. त्याने इंग्लंडच्या बेन डकेटला मागे टाकले आहे. डकेटने 16 सामन्यात 1,028 धावा केल्या आहेत. आता यशस्वीने 10 सामन्यात 1,084 धावा केल्या आहेत. जो रूट (1,398 धावा) पहिल्या स्थानावर आहे. यशस्वी हा डब्ल्यूटीसी 23-25 च्या हंगामात सर्वाधिक 144 वेळा चेंडू सीमापार (चौकार आणि षटकार) पाठवणारा फलंदाज बनला आहे. त्याने 117 चौकार आणि 29 षटकार मारले आहेत. याबाबतीत त्याने जो रूटला मागे टाकले आहे. रूटने WTC 2023-25 ​​च्या हंगामात आतापर्यंत 143 तर बेन डकेटने 140 वेळा चेंडू सीमापार पाठवला आहे.

यशस्वीची कसोटी कारकीर्द कशी राहिली?

यशस्वीने आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या 17 डावांमध्ये तो एकदा नाबाद राहिला आहे. त्याने 67.75 च्या उत्कृष्ट सरासरीने 1,084 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 5 अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 214 धावा आहे. या खेळाडूने 2023 साली वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news