

India squad changes : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे दोघे दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारतीय पुरुष निवड समितीने आज (दि. १२ जुलै) या दोन्ही खेळाडूंच्या बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १४ जुलैपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय पुरुष निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी प्रिन्स यादवची निवड केली आहे, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीच्या जागी रवी बिश्नोईला संधी दिली आहे. ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान हर्षित राणाने त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये (मांडीच्या स्नायूंमध्ये) अचानक वेदना होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर स्कॅन रिपोर्टमध्ये 'ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग' दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर करण्यात आले असून, तो पुढील तपासणी आणि उपचारासाठी बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (BCCI COE) मध्ये अहवाल देईल. इंग्लंडने शनिवारी भारताचा पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० असा दारुण पराभव केला. भारताला शेवटच्या सामन्यात ५६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात प्रिन्सने ६० धावा दिल्या होत्या.
वरुण चक्रवर्तीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान डाव्या हॅमस्ट्रिंगमध्ये अचानक वेदना जाणवू लागल्या. एमआरआय (MRI) स्कॅनवरून त्याला 'ग्रेड-२ हॅमस्ट्रिंग'ची दुखापत झाल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे (बाहेर ठेवण्यात आले आहे). तो पुढील उपचारासाठी बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये दाखल होईल.यापूर्वी, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि 'मिस्ट्री' स्पिनर वरुण चक्रवर्ती हे स्नायूंचा ताण (Strains) आल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून बाहेर झाले होते. भारताने चौथ्या टी-२० सामन्यासाठी वरुण आणि हर्षितच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश केला होता.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.