India New vs Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताची कसून तयारी

अर्शदीप, गुरनूर आणि नबी मदतीसाठी संघाबरोबरच राहणार
India New vs Zealand
India New vs ZealandPudhari
Published on: 
Updated on: 

हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्ध १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या महत्त्वपूर्ण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मालिकेच्या तयारीसाठी भारताचे वेगवान गोलंदाज औकिब नबी, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग न्यूझीलंडमध्येच थांबणार आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात असलेल्या या तिघांवर कसोटी संघाच्या सरावात मदत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताचे सहायक प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सोमवारी ही माहिती दिली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज मंगळवारी (दि. ९) हॅमिल्टन येथे होणार आहे. त्यानंतर कसोटी संघातील प्रमुख खेळाडू वेलिंग्टनला रवाना होतील.

कर्णधार शुभमन गिल, अनुभवी सलामीवीर केएल राहुल, डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांचा त्यात समावेश आहे. ११ नोव्हेंबरपासून कसोटीपटूंचे विशेष सराव शिबिर सुरू होणार असून, त्यात पाच ते सहा सराव सत्रे आयोजित केली जाणार आहेत. खेळाडूंना आवश्यक सराव, तंदुरुस्ती आणि गोलंदाजी-फलंदाजीचा पुरेसा सराव मिळावा, यासाठी नियोजन करण्यात आल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले.

India New vs Zealand
IPL 2027 Player Trades: आयपीएल २०२७ साठी आठ खेळाडूंची अदलाबदल; ऋषभ पंतचे दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन

प्रशिक्षक वर्गाचेही दोन गट करण्यात येणार आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर १३ आणि १५ नोव्हेंबरला माऊंट माऊनगुनाई येथे होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी संघासोबत थांबतील. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे कोटक यांनी सांगितले. सैराज बहुतुलेही त्यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे, तर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्यासह प्रशिक्षकवर्गातील काही सदस्य कसोटी संघासोबत वेलिंग्टनला जातील.

हिरवळीच्या खेळपट्ट्यांचा कसोटीपूर्व तयारीला फायदा

ऑकलंडमधील ईडन पार्क आणि वेलिंग्टनमधील हेन्री स्टेडियमवरील हिरवळीच्या खेळपट्ट्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे कोटक यांनी नमूद केले. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील चेंडूचा रंग व खेळण्याची मानसिकता वेगळी असली, तरी खेळपट्टीचा स्वभाव समजून घेण्यासाठी सध्याचे सामने फायदेशीर आहेत.

India New vs Zealand
IOA Election Results: आयओएच्या निवडणुकीत पी. टी. उषा यांना धक्का; सायना नेहवाल, अंजू बॉबी जॉर्ज विजयी

वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर साधारण १२ ते १४ मिलिमीटर हिरवळ ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा अंदाज भारतीय खेळाडूंना घेता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.