बांगला देशचा सुपडासाफ..! टीम इंडियाचा कानपूर कसोटीत दिमाखदार विजय

India vs Bangladesh : मालिकेवर निर्विवाद वर्चस्व, WTCतील अग्रस्‍थानही कायम
India vs Bangladesh 2nd Test
भारताने आज (दि.१ ऑक्‍टोबर) बांगला देश विरुद्ध कानपूर कसोटीत सात गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पहिल्‍या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ...यानंतर सलग दोन दिवस पावसामुळे वाया गेले... मात्र यानंतर अवघ्‍या दीड दिवसात अनेक विक्रम नाेंदवत टीम इंडियाने अशक्‍य ते शक्‍य करुन दाखवले. फलंदाजांची धडाकेबाज कामगिरी त्‍याला भेदक गोलंदाजीची साथ मिळाल्‍याने भारताने आज (दि.१ ऑक्‍टोबर) कानपूर कसोटीत सात गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. या विजयामुळे बांगला देश विरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC ) गुणतालिकेतील आपले अग्रस्‍थानही कायम ‍ठेवले आहे. (India vs Bangladesh 2nd Test) दरम्‍यान, मालिकेत ११ विकेट घेणारा रविचंद्रन अश्विन हा मालिकावीर तर दुसर्‍या कसोटीतील दोन्‍ही डावात अर्धशतक झळकवणारा यशस्‍वी जैस्‍वाल सामनावीर ठरला.

कानपूर कसोटीत अवघ्‍या दाेन दिवसांचा खेळ

दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्याचवेळी पहिल्या दिवशी केवळ 35 षटकेच खेळता आली. टीम इंडियाने बांगलादेश पहिल्या डाव २३३ धावांवर गुंडाळला. यानंतर भारताने नऊ विकेट्सवर 285 धावा करून पहिला डाव घोषित केला. टीम इंडियाकडे 52 धावांची आघाडी होती. चौथ्‍या दिवशी बांगलादेशच्‍या दोन विकेटही भारताने घेतल्‍या होत्‍या. बांगलादेशच्या संघाने मंगळवारी दोन बाद २६ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 120 धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या. बांगलादेशकडून शादमान इस्लामने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याने 101 चेंडूत 10 चौकार मारले. याशिवाय आज बाद झालेल्यांमध्ये मोमिनुल हक (2), कर्णधार नजमुल शांतो (19), मुशफिकुर रहीम (37), लिटन दास (1), मेहदी हसन मिराज (9) यांचा समावेश आहे. शकील अल हसन आणि तैजुल इस्लाम यांना खातेही उघडता आले नाही. याआधी सोमवारी झाकीर हसन (10) आणि हसन महमूद (2) बाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला आणि त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ९५ धावांचे लक्ष्‍य मिळाले.

१८ षटकांमध्‍ये विजयाची औपचरिकता पूर्ण

कानपुर कसोटी जिंकण्‍यासाठी भारताला ९५ धावांचे लक्ष्‍य मिळाले. विजयाची औपचरिकता पूर्ण करण्‍यासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले. मात्र तिसर्‍या षटकात भारताला पहिला धक्‍का बसला. कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर बाद झाला. तर पाच षटकात ६ धावांवर खेळणार्‍या शुभमन गिल याला मिराज याने पायचीत केले. ३४ धावांवर भारताला दुसरा धक्‍का बसला. यानंतर यशस्‍वी जैस्‍वाल आणि विराट काेहली यांच्‍या खेळीने भारताला विजया समीप नेले. १६ व्‍या षटकात फटकेबाजीच्‍या नादात जैस्‍वालने शकीबकडे साेपा झेल दिला. त्‍याने ४५ चेंडूत ८ चाैकार आणि १ षटकार फटकावत ५१ धावांची खेळी केली. विराट आणि यशस्‍वीची तिसर्‍या विकेटसाठी निर्णायक ५८ धावांची भागीदारी झाली. १८ व्‍या षटकात भारताने ९५ धावांचे लक्ष्‍य पूर्ण केले. भारताच्‍या दुसर्‍या डावात यशस्‍वी जैस्‍वालच्‍या अर्धशतकी खेळीबराेबरच विराट काेहलीची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. विराट ३७ चेंडूत २९ धावा तर पंत ४ धावांवर नाबाद राहिले.

बांगला देशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळला

बुमराह ३, सिराज, अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ तसेच रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बांगला देशचा पहिला डाव सर्वबाद २३३ धावांवर गुंडाळला.

भारताने पहिला डाव केला 285 धावांवर घोषित

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. बांगलादेशने त्यांच्या दुस-या डावाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, भारताने बांगलादेशचा पहिला डाव 233 गारद केला आणि फलंदाजी करताना पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 285 धावांवर घोषित केला. यासह भारताला 52 धावांची आघाडी मिळवली. भारताकडून यशस्वी जैस्वाल (72), केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली (47) आणि शुभमन गिल (39) यांचे अर्धशतक हुकले. कर्णधार रोहित शर्माने 23 धावांचे योगदान दिले.

सामन्‍यात अवघ्‍या १७४ षटकांचा खेळ

कसोटी सामन्‍यात एका दिवसात ९० षटकांचा खेळ हाेताे. कानपूर कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात 74.2 षटके खेळली, भारताने पहिल्या डावात 34.4 षटके खेळली. बांगलादेशने दुसऱ्या डावात 47 षटके खेळली आणि भारताने दुसऱ्या डावात बांगलादेशने दिलेले ९५ धावांचे लक्ष्‍य अवघ्‍या 17.2 षटकांमध्‍येच पूर्ण केले. या कसोटीत 174 षटकांचा खेळ झाला.

भारताने केला विश्‍वविक्रम

कानपूर कसोटी टीम इंडियाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पावसामुळे सामना विस्कळीत झाला आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला. चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारताने शानदार फलंदाजी करत कसोटीत कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा करण्याचा विश्‍व विक्रमही केला.

घरच्‍या मैदानावर भारताचा सलग १८वी मालिका जिंकली

टीम इंडियाने घरच्‍या मैदानावर सलग १८ वी मालिका जिंकली आहे. २०१३ पासून भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात खेळताना एकही मालिका गमावलेली नाही. त्‍यचबरोबर बांगला देशविरोधात अजिंक्‍य राहण्‍याचा भारताचा विक्रम अबाधित राहिला आहे. आतापर्यंत उभय संघात १५ सामने झाले असून, भारताने एकही सामना गमावलेला नाही.

जैस्‍वालच्‍या सर्वाधिक धावा तर अश्‍विन-बुमराहने घेतल्‍या सर्वाधिक विकेट

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने दुसर्‍या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. जैस्वालने या मालिकेत 47.25 च्या सरासरीने 189 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी मालिकेत प्रत्‍येकी प्रत्येकी 11 विकेट घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news