T20 World Cup : भारतासह ‘हे’ संघ T20 वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार, जय शहा यांचे भाकीत

T20 World Cup : भारतासह ‘हे’ संघ T20 वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार, जय शहा यांचे भाकीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : पुढील महिन्यात 2 जूनपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी, भारत आणि विदेशातील क्रिकेट तज्ज्ञ या स्पर्धेतील मजबूत प्रतिस्पर्धी तसेच कोणते संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात याबद्दल बोलत आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही त्यांचे मत मांडत स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे प्रबळ दावेदार कोणते असू शकतात याचे भाकित केले आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेलेल्या मुलाखतीत जय शहा यांना अगामी टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार कोणते संघ असतील? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शहा म्हणाले की, 'भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यजमान वेस्ट इंडिज हे संघ टी-20 मध्ये चांगले आहेत. या संघांपैकी एक संघ नक्कीच विश्वचषक स्पर्धा जिंकेल असा मला विश्वास आहे.' (T20 World Cup)

भारतीय टी-20 संघाच्या सध्याच्या फॉर्मबद्दल विचारले असता, बीसीसीआय सचिव म्हणाले, 'टीम इंडियाचा फॉर्म आहे. संघातील खेळाडूंचा अनुभव मोठा आहे, ज्यामुळे संघात समतोल आहे. निवडकर्ते केवळ आयपीएल कामगिरीच्या आधारावर निवड करू शकत नाहीत, कारण परदेशी अनुभव देखील आवश्यक आहे.'

शहा यांना त्यांच्या तीन आवडत्या ऑल-टाइम क्रिकेट आयकॉनबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, 'साहजिकच सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी. सध्याच्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांचाही समावेश आहे.' (T20 World Cup)

टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, तर 9 जूनला टीम इंडियाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे 29 जून रोजी खेळवला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news