IND vs ZIM 3rd T20: भारताचा झिम्बाबेवर 23 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

आवेश खान आणि सुंदरच्या गोलंदाजीसमोर झिम्बाबे गारद
IND vs ZIM 3rd T20I
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताची मालिकेत 2-1 ने आघाडी

भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या (66) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान संघाला 183 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या. यजमान झिम्बाब्वेकडून डिऑन मायर्सने (नाबाद 65) अर्धशतक झळकावले. क्लाइव्ह मदंडेने 37 धावांची खेळी केली. भारताकडून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 15 धावा देऊन तीन बळी घेतले. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. वेगवान गोलंदाज आवेश खानने दोन आणि खलील अहमदने एक विकेट घेतली.

बुधवारी (दि.10) हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 159 धावा करता आल्या. संघाने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. तेथून डिओन मायर्सने 49 चेंडूत 65 धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने क्लाइव्ह मदांडेसोबत सहाव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून संघाच्या आशा उंचावल्या होत्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारतीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 बळी घेतले. तर आवेश खानने 2 बळी घेतले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शुभमन गिल (66) आणि यशस्वी जैस्वाल (36) या सलामीच्या जोडीने 67 धावांची भागीदारी केली. यानंतर कर्णधार गिलला ऋतुराज गायकवाडची (49) चांगली साथ लाभली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

गिलने दुसरे अर्धशतक

मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरलेला गिल तिस-या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने आणि जैस्वालच्या साथीने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 55 धावा जोडल्या. एका टोकाकडून दमदार फलंदाजी करणाऱ्या गिलने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 49 चेंडूत 66 धावांची खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले.

गायकवाडचे अर्धशतक हुकले

मालिकेतील दुस-या सामन्यात 77 धावांची नाबाद खेळी खेळणाऱ्या गायकवाडला सलग दुस-या अर्धशतकाने हुलकावणी दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला गायकवाड 28 चेंडूत 49 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. भारताच्या डावातील शेवटच्या षटकात तो बाद झाला.

वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी

लक्ष्याचा बचाव करताना वॉशिंग्टनने ‘सुंदर’ गोलंदाजी केली. या अष्टपैलू खेळाडूने 4 षटकात केवळ 15 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने सिकंदर रझा, जोनाथन कॅम्पबेल आणि मदंडे यांच्या विकेट घेतल्या. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या रवी बिश्नोईला एकही विकेट घेता आली नाही. त्याने 4 षटकात 37 धावा दिल्या. आवेश खानने 2 विकेट्स घेत्ल्या, तर खलील अहमदला 1 बळी मिळाला.

झिम्बाबेला सहावा धक्का

सतराव्या षटकांमध्ये झिम्बाबेला सहावा धक्का बसला आहे. सुंदरने सतरावे षटक टाकत मदांडे आणि मायर्सची 77 धावांची भागीदारी तोडली आहे. आक्रमक खेळणाऱ्या मदांडेला त्याने सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. मदांडेने 26 चेंडूत 37 धावा केल्या. त्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकरांचा समावेश आहे.

मायर्स-मदांडे यांनी डाव सावरला

माईर्स आणि मदांंडे यांनी झिम्बाबेचा डाव सांभाळला आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी बहरत आहे. 13 षटकांनंतर धावसंख्या 86 धांवावर 5 बाद अशी आहे. माईर्स आणि मदांडे यांच्यामध्ये 46 चेंडूमध्ये 69 धावांची भागीदारी झाली आहे. दोघेही चौफेर फटकेबाजी करत संघाला विजयाच्या दिशेने घेवून जाण्याच अग्रेसर आहेत.

वॉशिंग्टन सुंदरने घेतले सातव्या षटकांत दोन बळी

दुसऱ्या इनिंगमध्ये सुंदरने सातव्या षटकांत गोलंदाजीला सुरुवात केली. या षटकामध्ये त्याने झिम्बाबेचे दोन खेळाडूंना माघारी पाठवले. तसेच भारतीय संघाची विजयाच्या दिशेने घोडदौड कायम ठेवली. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रजा बाद केले. याबरोबरच सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कैम्पबेलला बाद केले.

झिम्बाब्वेला बसला चौथा धक्का

झिम्बाब्वेला चौथा झटका सिकंदर रझाच्या रूपाने बसला. त्याला वॉशिंग्टन संदपने रिंकू सिंगच्या हाती झेलबाद केले. त्याला केवळ 15 धावा करता आल्या. 34 धावांवर झिम्बाब्वेच्या कर्णधाराची विकेट पडली. जोनाथन कॅम्पबेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

सहा षटकानंतर झिम्बाबे 3 बाद 37

दुसऱ्या इनिंगमध्ये 182 धावांचा पाठलाग करताना झिम्बाबेची संथ सुरुवात झालेली आहे. झिम्बाबे संघाने सहा षटकांमध्ये केवळ 37 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या 36 चेंडूमध्ये झिम्बाबे संघाने 20 बॉल डॉट खेळले आहेत.

19 धावांवर झिम्बाब्वेचे दोन गडी बाद

झिम्बाब्वेला दुसरा आणि तिसरा धक्का 19 धावांवर बसला. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर खलीलने मारुमनीला बाद केले. त्याचवेळी भेदक गोलंदाजी आवेश खानने तिसरा धक्का दिला. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ब्रायन बेनेटला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या.

मारुमानी 13 धावांवर बाद

खलील अहमदने टाकलेल्या तिसऱ्या षटकांत झिम्बाबेला दुसरा झटका बसला. मारुमानीने उंच फटका मारण्याच्या नादात शिवम दुबेकडे झेल दिला. त्याने तीन चौकार मारत 10 चेंडू खेळत 13 धावा चोपल्या आहेत.

झिम्बाब्वेला पहिला धक्का

झिम्बाबेचा सलामी फलंदाज मधवेरे 1 धाव करुन बाद झाला आहे. आवेश खानने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला आहे. त्याला 2 चेंडूत केवळ 1 धाव करता आली आहे.

भारताने झिम्बाब्वेला दिले 183 धावांचे लक्ष्य

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली, जी नवव्या षटकात सिकंदर रझाने तोडली. त्याने जैस्वालला बेनेटकरवी झेलबाद केले. जैस्वाल 133.33 च्या स्ट्राइक रेटने चार चौकार आणि दोन षटकार ठोकून 27 चेंडूत 36 धावा केल्या. यानंतर अभिषेक शर्मा आला. मात्र, त्याला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. अवघ्या 10 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर ऋतुराज गायकवाडने गिलला साथ दिली. त्याने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. 18व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मुझाराबानीने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने कर्णधार गिलला बाद केले. गिलने या सामन्यात आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तीन षटकार आले.

ऋतुराज गायकवाडने 49 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. 28 चेंडूंचा सामना करताना त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. भारताकडून संजू सॅमसन 12 धावांवर नाबाद राहिला तर रिंकू सिंग एका धावेवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून मुझाराबानी आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

भारताची तिसरी विकेट

भारतीय संघाने 17.5 षटकात तिसरी विकेट गमावली. कर्णधार शुभमन गिल झेलबाद झाला. मुजरबानीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गिल बाद झाला. त्याने 49 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले. संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

कर्णधार गिलचे अर्धशतक

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने गिलने 36 चेंडूत अर्धशतक झळकावले. तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी, ऋतुराज गायकवाड 20 चेंडूत 19 धावा करून क्रीजवर आहे. शुभमनने 7 चौकार आणि 2 षटकार लगावत अर्धशतक झळकावले. भारतीय संघाने 14 षटकात 2 बाद 118 धावा केल्या.

भारताला दुसरा धक्का

भारताला दुसरा धक्का 81 धावांवर बसला. सिकंदर रझाने सिकंदरने गेल्या सामन्याचा शतकवीर अभिषेक शर्माची विकेट घेतली. अभिषेक 9 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

10 षटकात 80 धावा

भारतीय संघाने 10 षटकात 1 गडी गमावून 80 धावा केल्या. कर्णधार गिल आणि अभिषेक शर्मा क्रीजवर आहेत. गिल 27 चेंडूत 33 तर अभिषेक शर्मा 7 चेंडूत 10 धावांवर खेळत आहे.

भारताने पहिली विकेट गमावली

भारतीय संघाने 8.1 षटकात 67 धावांवर पहिली विकेट गमावली. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने यशस्वी जैस्वालची विकेट घेतली. जैस्वालने 27 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर अभिषेक शर्मा फलंदाजीला आला.

पॉवरप्लेमध्ये 55 धावा

भारतीय संघाने शानदार सुरुवात करत पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 55 धावा केल्या. कर्णधार गिलने 18 चेंडूत 27 आणि यशस्वी जैस्वालने 18 चेंडूत 27 धावा केल्या.

6 व्या षटकात एकच धाव

जैस्वाल आणि गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी जवळपास 10च्या सरासरीने पाच षटकात धावा वसूल केल्या. मात्र, सहाव्या षटकात भारताला केवळ एक धाव मिळाली. मुजरबानीने टीच्चून गोलंदाजी केली.

पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

भारताने 5 षटकात 54 धावा केल्या. गिल आणि जैस्वाल जोडीने अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. यापूर्वी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली होती.

4 षटकात 49 धावा

भारतीय संघाने 4 षटकात 49 धावा केल्या. जैस्वालने 12 चेंडूत 208 च्या स्ट्राईक रेटने 25 धावा केल्या. तर कर्णधार गिलने 13 चेंडूत 176 च्या स्ट्राईक रेटने 23 धावा केल्या. या खेळीदरम्यान, जैस्वालने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. तर गिलने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.

3 षटकात 41 धावा

गिल आणि जैस्वाल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी संघाची धावसंख्या 3 षटकांत 41 धावांवर पोहोचवली. यामध्ये शुभमन गिलने 7 चेंडूत 15 तर जैस्वालने 12 चेंडूत 25 धावा केल्या.

2 षटकात 29 धावा चोपल्या

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 2 षटकात 29 धावा लुटल्या.

पहिल्याच षटकात स्फोटक सुरुवात

टीम इंडियाने पहिल्याच षटकात स्फोटक केली. जैस्वालने पहिल्या षटकात 15 धावा वसूल केल्या. त्याने 1 षटकार आणि 2 चौकार लगावले.

गिल-जैस्वालची सलामी

भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. दरम्यान, ब्रायन बेनेट झिम्बाब्वेसाठी पहिले षटक टाकले. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माला या सामन्यात सलामीवीर म्हणून पाठवण्यात आलेले नाही. तो तिस-या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

झिम्बाब्वेचा संघ

सिकंदर रझा (कर्णधार), तदिवनाशे मारुमणी, वेस्ली मादवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.

झिम्बाब्वे संघात दोन बदल

झिम्बाब्वे संघाने आपल्या प्लेइंग-11 मध्ये 2 बदल केले आहेत. कॅप्टन सिकंदर रझा यांनी सांगितले की, इनोसेंट कैया जखमी झाला आहे. त्याच्या जागी तदिवनाशे मारुमणीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर ल्यूक जोंगवेच्या जागी रिचर्ड नगारवाचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND vs ZIM 3rd T20I Updates

भारताने बुधवारी तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या (66) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान संघाला 183 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या. यजमान झिम्बाब्वेकडून डिऑन मायर्सने (नाबाद 65) अर्धशतक झळकावले. क्लाइव्ह मदंडेने 37 धावांची खेळी केली. भारताकडून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 15 धावा देऊन तीन बळी घेतले. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. वेगवान गोलंदाज आवेश खानने दोन आणि खलील अहमदने एक विकेट घेतली.

बुधवारी (दि.10) हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 159 धावा करता आल्या. संघाने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. तेथून डिओन मायर्सने 49 चेंडूत 65 धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने क्लाइव्ह मदांडेसोबत सहाव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून संघाच्या आशा उंचावल्या होत्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारतीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 बळी घेतले. तर आवेश खानने 2 बळी घेतले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शुभमन गिल (66) आणि यशस्वी जैस्वाल (36) या सलामीच्या जोडीने 67 धावांची भागीदारी केली. यानंतर कर्णधार गिलला ऋतुराज गायकवाडची (49) चांगली साथ लाभली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

गिलने दुसरे अर्धशतक

मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरलेला गिल तिस-या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने आणि जैस्वालच्या साथीने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 55 धावा जोडल्या. एका टोकाकडून दमदार फलंदाजी करणाऱ्या गिलने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 49 चेंडूत 66 धावांची खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले.

गायकवाडचे अर्धशतक हुकले

मालिकेतील दुस-या सामन्यात 77 धावांची नाबाद खेळी खेळणाऱ्या गायकवाडला सलग दुस-या अर्धशतकाने हुलकावणी दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला गायकवाड 28 चेंडूत 49 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. भारताच्या डावातील शेवटच्या षटकात तो बाद झाला.

वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी

लक्ष्याचा बचाव करताना वॉशिंग्टनने ‘सुंदर’ गोलंदाजी केली. या अष्टपैलू खेळाडूने 4 षटकात केवळ 15 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने सिकंदर रझा, जोनाथन कॅम्पबेल आणि मदंडे यांच्या विकेट घेतल्या. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या रवी बिश्नोईला एकही विकेट घेता आली नाही. त्याने 4 षटकात 37 धावा दिल्या. आवेश खानने 2 विकेट्स घेत्ल्या, तर खलील अहमदला 1 बळी मिळाला.

भारतीय संघात बदल

भारताचा कर्णधार शुबमन गिलने संघात बदल केले आहेत. त्याने संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांना संधी दिली आहे. तर मुकेश कुमारच्या जागी खलील अहमद खेळताना दिसेल.

भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि खलील अहमद.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news