IND vs SA Test Series : भारत दौऱ्यासाठी द. आफ्रिकेचा संघ जाहीर, बवुमाचे पुनरागमन; तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांचा समावेश

South Africa Test Squad : मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सामने गुवाहाटी आणि कोलकाता येथे खेळवले जाणार आहेत.
IND vs SA Test Series : भारत दौऱ्यासाठी द. आफ्रिकेचा संघ जाहीर, बवुमाचे पुनरागमन; तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांचा समावेश
Published on
Updated on

ind vs sa test series temba bavuma to return as south africa captain tests test squad announce

केपटाऊन : कर्णधार टेम्बा बवुमा पोटरीच्या दुखापतीतून सावरला असून, भारताविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिक न संघात त्याचे पुनरागमन झाले आहे. ही मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सामने गुवाहाटी आणि कोलकाता येथे खेळवले जाणार आहेत.

बवुमा अलीकडेच पाकिस्तानमध्ये झालेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत खेळू शकला नव्हता. ही मालिका बरोबरीत सुटली होती. पाकिस्तान दौऱ्यावरील बहुतांश संघ कायम ठेवण्यात आला असून, डेव्हिड बेडिंगहॅमच्या जागी बवुमाची संघात वर्णी लागली आहे.

IND vs SA Test Series : भारत दौऱ्यासाठी द. आफ्रिकेचा संघ जाहीर, बवुमाचे पुनरागमन; तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांचा समावेश
Shreyas Iyer Injury Updates : ‘श्रेयस अय्यर’ ICU मधून बाहेर; गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर

मागील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणारा बवुमा, 2 नोव्हेंबर रोजी बंगळूर येथे सुरू होणाऱ्या भारत ‌‘अ‌’ संघाविरुद्धच्या सराव मालिकेतही खेळण्याची शक्यता आहे. याच मालिकेतून ऋषभ पंतही दुखापतीनंतर पुनरागमन करणार आहे.

IND vs SA Test Series : भारत दौऱ्यासाठी द. आफ्रिकेचा संघ जाहीर, बवुमाचे पुनरागमन; तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांचा समावेश
Prithvi Shaw Double Century : २९ चौकार, ५ षटकार... पृथ्वी शॉने ठोकले वादळी द्विशतक! रणजी ट्रॉफीमध्ये रचला इतिहास

सायमन हार्मर, केशव महाराज आणि सेनुरन मुथुसामी या दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी त्रिकुटाने पाकिस्तानमधील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे येथेही द. आफ्रिकेची पुन्हा एकदा फिरकीवरच भिस्त असेल, असे निवडीवरून स्पष्ट झाले आहे.

IND vs SA Test Series : भारत दौऱ्यासाठी द. आफ्रिकेचा संघ जाहीर, बवुमाचे पुनरागमन; तीन प्रमुख फिरकी गोलंदाजांचा समावेश
Women's World Cup Semifinal : टीम इंडियाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकेचा संघ

टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काईल व्हेरेन, डेवाल्ड ब्रेविस, झुबायर हमजा, टोनी डी झोर्झी, कॉर्बिन बॉश, विआन मुल्डर, मार्को यान्सेन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, सायमन हार्मर.

भारत-द. आफ्रिका क सोटी मालिकेची रूपरेषा

14 ते 18 नोव्हेंबर : पहिली कसोटी : कोलकाता

22 ते 26 नोव्हेंबर : दुसरी कसोटी : गुवाहाटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news