Rishabh Pant : पराभवानंतरचा माफीनामा... ऋषभ पंत म्‍हणाला, "आम्‍हाला ..."

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्‍या नामुष्‍कीजनक पराभवानंतर सोशल मीडियावर केली पोस्‍ट
Rishabh Pant : पराभवानंतरचा माफीनामा... ऋषभ पंत म्‍हणाला, "आम्‍हाला ..."
Published on
Updated on

Rishabh Pant Apologizes To Fans

नवी दिल्‍ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या कसोटीत भारताला ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्‍यात टीम इंडियाचे नेत्तृत्त्‍व करणार्‍या ऋषभ पंतने नामुष्‍कीजनक पराभवावर आपले मौन सोडले आहे. गुवाहाटी कसोटी सामन्‍यात भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी केली नाही, असे त्‍याने सोशल मीडियावरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे. तसेच त्‍याने चाहत्‍यांची माफीही मागितली आहे.

आम्‍ही चांगले क्रिकेट खेळलो नाही ....

पंतने इन्‍टाग्रामवर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "गेल्या दोन आठवड्या आम्‍ही चांगले क्रिकेट खेळलो नाही. एक संघ म्हणून आणि वैयक्तिकरित्या आम्हाला नेहमीच सर्वोच्च पातळीवर कामगिरी करायची आहे. आता पुन्‍हा एकदा लाखो भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण न केल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, परंतु खेळ तुम्हाला संघ म्हणून आणि वैयक्तिकरित्या शिकण्यास, जुळवून घेण्यास आणि वाढण्यास शिकवतो."

Rishabh Pant : पराभवानंतरचा माफीनामा... ऋषभ पंत म्‍हणाला, "आम्‍हाला ..."
South Africa Defeat India: दक्षिण अफ्रिकेनं २५ वर्षानंतर भारतात कसोटी मालिका जिंकली; टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव

आम्‍ही कठोर परिश्रम करु

"भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. या संघाची क्षमता आम्‍हाला माहित आहे. आम्ही कठोर परिश्रम करू, पुन्हा संघटित होऊ, पुन्हा लक्ष केंद्रित करू आणि एक संघ आणि वैयक्तिकरित्या आणखी चांगले आणि मजबूत परत येऊ, असा विश्‍वासही पंतने व्‍यक्‍त केला आहे.

Rishabh Pant : पराभवानंतरचा माफीनामा... ऋषभ पंत म्‍हणाला, "आम्‍हाला ..."
South Africa Record : द. आफ्रिकेचा भारतीय भूमीवर ऐतिहासिक पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटीत फ्‍लॉप

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने सहा कसोटी मालिका खेळल्या आहेत. संघाने बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर २-० असा विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला ०-३ असे पराभूत केले. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाला ३-१ असा पराभव पत्करावा लागला, इंग्लंडमधील पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत साधण्‍यात संघाला यश आले. यानंतर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर २-० असा विजय मिळवला, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या ०-२ अशा पराभवाने पुन्हा एकदा संघाच्‍या मर्यादा स्‍पष्‍ट झाल्‍या. गौतम गंभीरच्‍या प्रशिक्षण काळात घरच्‍या मैदानावरच टीम इंडियाला नामुष्‍कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news