बुमराहला घाई-घाईत बनवले उपकर्णधार? रोहित शर्माने केला मोठा खुलासा, म्हणाला...

rohit sharma statement on jasprit bumrah vice captaincy
बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार आहेFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah Vice Captaincy : जसप्रीत बुमराह याची न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी कोणत्याही खेळाडूला उपकर्णधार बनवण्यात आले नव्हते. पण किवींविरुद्धच्या मालिकेत ही जबाबदारी बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या निवडीवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

हिटमॅन रोहित म्हणाला की, जसप्रीत बुमराहला खेळाची खूप चांगली समज आहे. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. तो सुरुवातीपासून संघाच्या नेतृत्व गटाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या नेतृत्वाविषयी मी जास्त काही बोलू शकणार नाही. माझ्या माहितीनुसार, त्याने आतापर्यंत एक कसोटी आणि काही टी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या लीडरची गरज असते अशा परिस्थितीत बुमराह त्यांच्यापैकी एक असेल असे मला वाटते. त्यामुळे तो सुरुवातीपासूनच आमच्या नेतृत्व गटाचा एक भाग आहे. संघात सामील होणाऱ्या नव्या गोलंदाजांशी चर्चा करणे असो किंवा संघाला पुढे कसे न्यायचे यावर चर्चा असो, त्याच्या मार्गदर्शनाचा नेहमीच फायदा होतो.’

बुमराहने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. गेल्या वर्षी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी त्याची भारताच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news