पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (16 ऑक्टोबर) बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिल बंगळुरू कसोटीत खेळणे खूप कठीण आहे. वास्तविक, गिलला अचानक मानेच्या दुखापतीचा त्रास उद्भवला आहे, ज्यामुळे तो प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर पडू शकतो. अशा परिस्थितीत त्याच्या जागी सरफराज खानला संधी मिळू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिलच्या मानेमध्ये कडकपणा आला आहे. त्यामुळे त्याला वेदना होत आहेत. तो बेंगळुरू कसोटीपूर्वी तंदुरुस्त होणे थोडे कठीण आहे. त्याच्या जागी सरफराज खान खेळू शकतो, ज्याने इराणी चषकात शानदार द्विशतक झळकावले होते. मात्र, कर्णधार रोहित त्याला तिसऱ्या क्रमांकावर उतरवणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
बंगळुरू कसोटीत टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. बांगलादेशविरुद्ध जे कॉम्बिनेशन मैदानात उतरवले होते तेच कॉम्बिनेशन असेल अशी शक्यता आहे. म्हणजे रोहित-जैस्वाल सलामीला येतील. त्यानंतर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली चौथ्या, तर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळेल आहे. सरफराजला सहाव्या क्रमांकावर संधी मिळेल. तर जडेजा सातव्या क्रमांकावर उतरू शकतो. अश्विन 8व्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह, सिराज आणि आकाश दीपला संधी मिळू शकते.