भारत विरुद्ध इंग्लंड कोण कोणापेक्षा बलवान, जाणून घ्या आकडेवारी

IND vs ENG T20 Series : विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच इंग्लंडशी सामना
भारत विरुद्ध इंग्लंड कोण कोणापेक्षा बलवान, जाणून घ्या आकडेवारी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG T20 Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील 1-3 असा पराभव विसरून, भारतीय संघाने नवीन वर्षात आपल्या नवीन मोहिमेची तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ आता घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही एक अतिशय खास मालिका असणार आहे.

खरं तर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही स्वरूपात ही पहिलीच मालिका असणार आहे. या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत इंग्लंडला हरवण्याचे मोठे आव्हान त्याच्या खांद्यावर असेल. कोहली आणि रोहितच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाने अनेक टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या असल्या तरी, कोणत्याही फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्धचा हा पहिलाच सामना असणार आहे.

टी-20 विश्वचषकात टफफाईट

भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात 2024 च्या टी-20 विश्वचषकात चुरशीचा सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही संघ उपांत्य फेरीत 27 जून 2024 रोजी गयाना येथील मैदानावर आमनेसामने आले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतीय संघाने जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाचा 68 धावांनी पराभव केला होता.

या विजयानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. जिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. अशा परिस्थितीत तो विजय भारतासाठी खूप खास ठरला होता. अंतिम सामना जिंकल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली. दुसऱ्याच दिवशी, फिरकीपटू अष्टपैलू रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा म्हटले.

भारत आणि इंग्लंडमध्ये समान स्पर्धा

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेहमीच कठीण स्पर्धा राहिली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, दोघांमध्ये समान स्पर्धा दिसून येते.

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 हेड टू हेड

एकूण सामने : 24

भारत जिंकला : 13

इंग्लंड जिंकले : 11

2025 चा इंग्लंडचा भारत दौरा

टी-20 मालिका

  • पहिला टी-20 सामना : 22 जानेवारी, कोलकाता

  • दुसरा टी-20 : 25 जानेवारी, चेन्नई

  • तिसरा टी-20 : 28 जानेवारी, राजकोट

  • चौथा टी-20 सामना : 31 जानेवारी, पुणे

  • पाचवा टी-20 सामना : 2 फेब्रुवारी, मुंबई

एकदिवसीय मालिका

  • पहिला एकदिवसीय सामना : 6 फेब्रुवारी, नागपूर

  • दुसरा एकदिवसीय सामना : 9 फेब्रुवारी, कटक

  • तिसरा एकदिवसीय सामना : 12 फेब्रुवारी, अहमदाबाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news