10 धावांवर बाद होऊनही यशस्वी जैस्वालने सुनील गावस्कर यांना टाकले मागे

Yashasvi Jaiswal New Record : करिअरच्या पहिल्या 10 कसोटीतच ऐतिहासिक कामगिरी
yashasvi jaiswal sunil gavaskar
बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई करोटीत यशस्वी जैस्वालने नवा इतिहास रचला. त्याने माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर यांना मागे टाकले.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal New Record : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावात केवळ 10 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात 56 धावा करणारा जैस्वाल दुसऱ्या डावात फार काही करू शकला नाही, मात्र असे असतानाही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

यशस्वीचा हा 10वा कसोटी सामना आहे. भारतासाठी पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता यशस्वीच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम यापूर्वी सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. त्यांनी आपल्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 978 धावा केल्या होत्या. इतकेच नाही तर पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जैस्वालने ऑस्ट्रेलिआच्या मार्क टेलर यांनाही मागे टाकले आहे. टेलरने यांनी त्यांच्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1088 धावा केल्या होत्या. आता जैस्वालच्या नावावर 10 कसोटी सामन्यांनंतर 1094 धावा जमा झाल्या आहेत.

एकंदरीत बोलायचे झाले तर हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर वर्षानुवर्षे आहे. त्यांनी पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1446 धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा एव्हर्टन वीक्स आहे, ज्याने पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 1125 धावा केल्या. तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचेच जॉर्ज हॅडली आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 1125 धावा केल्या. यशस्वीने या डावात आणखी 9 धावा केल्या असत्या तर तो या यादीत टॉप-3 मध्ये पोहोचला असता, मात्र त्याला आता चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.

यशस्वीने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच 171 धावांची संस्मरणीय खेळी केली होती. त्याने 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर पदार्पण केले. तेव्हापासून तो सातत्याने टीम इंडियाचा भाग आहे. यशस्वीने 10 कसोटी सामन्यांच्या 18 डावांमध्ये तीन शतके झळकावली आहेत, ज्यात एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याच्या बॅटमधून पाच अर्धशतकेही झळकली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news