जसप्रीत बुमराह ‘400’ पार! ‘अशी’ कामगिरी करणारा भारताचा बनला 6वा वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah Record : विराट कोहलीने घेतला ऐतिहासिक झेल
ind vs ban test jasprit bumrah 400 international wickets
जसप्रीत बुमराह Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह धोकादायक गोलंदाजी करत आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या विश्रांतीपूर्वी त्याने 3 बळी घेतले. तिसरी विकेट घेताच बुमराहचे नाव क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेले. वास्तविक, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 बळी पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो भारताचा दहावा गोलंदाज ठरला आहे.

बुमराहने हसन महमूदला आपला 400 वा बळी बनवले. विराट कोहलीने महमूदचा झेल पकडला आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. बुमराहने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 37 कसोटी सामन्यांमध्ये 162* बळी, 89 एकदिवसीय सामन्यात 149 बळी आणि 70 टी-20 सामन्यात 89 बळी घेतले आहेत.

चेन्नई कसोटीत चेंडूने कहर

शुक्रवारी चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने आपल्या गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली. त्याने बांगलादेशचा सलामीवीर शदमान इस्लामला एका अप्रतिम चेंडूवर क्लिन बोल्ड केले. त्याची घातक गोलंदाजी इथेच थांबली नाही. पुढे त्याने मुशफिकुर रहीम माघारी धाडले आणि हसन महमूदची विकेट घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 वा बळी मिळवला. बुमराहचे हे यश भारताची खेळावरील पकड मजबूत करण्यात मोलाचे ठरले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 भारतीय गोलंदाज

1. अनिल कुंबळे : 499 डावात 953 विकेट्स

2. रविचंद्रन अश्विन : 369 डावात 744 विकेट्स

3. हरभजन सिंग : 442 डावात 707 विकेट्स

4. कपिल देव : 448 डावात 687 विकेट्स

5. झहीर खान : 373 डावात 597 विकेट्स

6. रवींद्र जडेजा : 397 डावात 570 विकेट्स

7. जवागल श्रीनाथ : 348 डावात 551 विकेट

8. मोहम्मद शमी : 188 सामन्यात 448 विकेट

9. इशांत शर्मा : 280 डावात 434 विकेट्स

10. जसप्रीत बुमराह : 227 डावात 401* विकेट्स

सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज

687 : कपिल देव

610 : झहीर खान

551 : जवागल श्रीनाथ

448 : मोहम्मद शमी

434 : इशांत शर्मा

401* : जसप्रीत बुमराह

बुमराहने मोडला हरभजनचा विक्रम

बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 227 डावात 400 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने माजी भारतीय स्पिनर हरभन सिंगला मागे टाकले. भज्जीने 237 डावांमध्ये अशी कामगिरी केली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 400 बळी घेणाऱ्या भारताच्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह पाचव्या क्रमांकावर पोहचला. या बाबतीत अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने 216 डावात 400 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतासाठी सर्वात कमी डावात 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे गोलंदाज

216 डाव : आर अश्विन

220 : कपिल देव

224 : मोहम्मद शमी

226 : अनिल कुंबळे

227 : जसप्रीत बुमराह

237 : हरभजन सिंग

भारतीय मैदानावर बुमराहचे आकडे

बुमराहने भारतीय भूमीवर आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 16 डावांत 15.94 च्या उत्कृष्ट सरासरीने 37 बळी घेतले आहेत. त्याने दोनदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 45 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी अशी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news