IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाण मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा, विराट कोहली-रोहित शर्मा मैदानात उतरणार

IND vs AFG Series Schedule Announced : प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुभमन गिल पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे.
IND vs AFG Series Schedule Announced: Virat Kohli and Rohit Sharma Set to Return
Published on
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय (ODI) मालिकेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. ही संपूर्ण मालिका जून महिन्यात खेळवली जाणार असून, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या द्विपक्षीय मालिकेबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. ही मालिका जूनमध्ये होणार हे निश्चित असले तरी, नेमके वेळापत्रक आणि ठिकाणे स्पष्ट नव्हती. आता बीसीसीआयने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या मालिकेत एका कसोटी सामन्यासह तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुभमन गिल पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे.

६ जूनपासून एकमेव कसोटी सामना

अफगाणिस्तानचा संघ जून महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. मालिकेची सुरुवात एका कसोटी सामन्याने होईल. वेळापत्रकानुसार, ६ ते १० जून दरम्यान न्यू चंदीगड (मुल्लांपुर) येथे हा कसोटी सामना खेळवला जाईल.

१४ जूनपासून एकदिवसीय थरार

कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे.

  • पहिला सामना : १४ जून, धर्मशाला

  • दुसरा सामना: १७ जून, लखनऊ

  • तिसरा सामना: २० जून, चेन्नई

ही मालिका २०२६ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय संघ या मालिकेद्वारे विश्वचषकाच्या तयारीचा श्रीगणेशा करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शुभमन गिलकडे नेतृत्व; दिग्गजांचे पुनरागमन

सध्या भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत असून, या मालिकेतही तोच कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू देखील या मालिकेत खेळताना दिसतील. हे दोन्ही खेळाडू सध्या प्रामुख्याने एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याने चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा मैदानात पाहण्याची संधी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news