आयसीसी क्रमवारीत उलटफेर! हॅरी ब्रूकची मोठी झेप, जैस्वाल-कोहलीला फटका

ICC Test Rankings : रूटने गाठले सर्वोच्च रेटिंग
icc test rankings
इंग्लंडच्याच हॅरी ब्रूकने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. जैस्वाल, कोहली यांना नुकसान सहन करावे लागले आहे.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन कसोटी क्रमवारीत अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम असून त्याच्या रेटिंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर इंग्लंडच्याच हॅरी ब्रूकने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. यामुळे भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना नुकसान सहन करावे लागले आहे.

रूटचे सर्वोच्च रेटिंग

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. वास्तविक, या क्रमांकावर तो बराच काळ आहे. पण यावेळी त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग मिळवले आहे. त्याचे रेटिंग आता 932 वर पोहोचले आहे. यानंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 829 आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.

ब्रूकने घडवला चमत्कार

इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने रेटिंगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. गेल्या आठवड्यापर्यंत पहिल्या दहामध्येही नसलेला ब्रूक आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. त्याने एकाच वेळी 11 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग आता 829 वर पोहोचले आहे. म्हणजेच तो केन विल्यमसनच्या बरोबरीने आहे. ब्रूकने मुलतान कसोटीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्रिशतक झळकावले होते, त्याचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे.

यशस्वी जैस्वालची एका स्थानाने घसरण

भारताच्या यशस्वी जैस्वालला मात्र एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता 792 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर गेला आहे. स्टीव्ह स्मिथलाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो आता 757 च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर गेला आहे. उस्मान ख्वाजाही आता एका स्थानाच्या पराभवासह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 728 आहे.

विराट कोहलीचेही नुकसान

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीलाही एका स्थानाचा फटका बसला आहे. तो आता 724 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर गेला आहे. मार्नस लॅबुशेनचीही एका स्थानावर घसरण झाली आहे. त्याचे रेटिंग 720 आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत 718 रेटिंगसह 9व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिशेल 718 रेटिंगसह 9व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर ब्रूकने अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news