ICC Test Rankings | WTC फायनलमध्‍ये पराभूत तरीही ऑस्‍ट्रेलिया कसोटीत नंबर 1, जाणून घ्‍या भारत कितव्‍या स्‍थानी?

दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्‍थानी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात पराभूत हाेवूनही   ऑस्‍ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम राहिला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात पराभूत हाेवूनही ऑस्‍ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम राहिला आहे. File Photo
Published on
Updated on

ICC Test Rankings |वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत शनिवार, १४ जून रोजी दक्षिण आफ्रिकेने कसोटी विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. मात्र या पराभवानंतरही ऑस्‍ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे.

दक्षिण आफ्रिका संघ दुसर्‍या स्‍थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकूनही दक्षिण आफ्रिका संघ अव्‍वल स्‍थानापासून वंचित राहिला असला तरी फायनल जिंकण्याचा फायदा झाला आहे. कारण हा संघ आता आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या वरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करूनही ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १२३ गुण आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ११४ गुण आहेत. इंग्लंडच्या संघाच्या खात्यात ११३ गुण आहेत. दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियापेक्षा ९ गुणांनी मागे आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात पराभूत हाेवूनही   ऑस्‍ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम राहिला आहे.
Temba bavuma | ऑस्ट्रेलियाचा पुन्‍हा रडीचा डाव, WTC फायनलमध्‍ये 'स्लेजिंग'!

भारतीय क्रिकेट संघ गुणतालिकेत चौथ्‍या स्‍थानी

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये इंग्लंडला एका स्थानाचे नुकसान सहन करावे लागले आहे. भारतीय संघ १०५ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पुढील काही सामन्यांनंतरही, ऑस्ट्रेलियाचे कसोटीतील अव्वल स्थान धोक्यात नाही, कारण रेटिंग गुणांचे अंतर खूप जास्त आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात पराभूत हाेवूनही   ऑस्‍ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम राहिला आहे.
Australia vs South Africa WTC Final : चोकर्सचा शिक्का पुसला; दक्षिण आफ्रिका कसोटीतील जगज्जेता

१७ जूनपासून सुरु होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीचे नवे चक्र

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पुढील चक्र १७ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंकेतील गॅले येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियन संघ स्वतः या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात करेल. ऑस्ट्रेलियन संघाने ती मालिका गमावली तर रँकिंगमध्ये नुकसान होऊ शकते, परंतु जर कांगारू संघाने मालिका जिंकली तर ते इतर संघांपेक्षा आणखी पुढे जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात पराभूत हाेवूनही   ऑस्‍ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम राहिला आहे.
WTC Final : जाणून घ्‍या द. आफ्रिका संघाला कसा लागला 'चोकर्स टॅग' ?

ऑस्‍ट्रेलिया खेळावे लागणार जास्‍तीत जास्‍त २२ सामने

वेळापत्रकानुसार, ऑस्ट्रेलिया यावेळी जास्तीत जास्त २२ सामने खेळेल, तर इंग्लंडला २१ सामने खेळावे लागतील. या वर्षाच्या अखेरीस अॅशेस मालिकेदरम्यान दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. तर भारतीय संघ २० जूनपासून नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहिमेला सुरूवात करणार आहे.एकूण ७१ सामने असलेले आणि पुढील दोन वर्षांच्या कालावधीत होणाऱ्या WTC 2025-27 या चक्रामध्ये नऊ संघ सहभागी होतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दोन वेळा उपविजेता ठरलेली टीम इंडियाचा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या सामन्‍याने सुरुवात करेल.

WTC 2025-27 च्या चक्रामध्ये भारत खेळणार १८ सामने

२०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात भारत १८ कसोटी सामने खेळणार आहे. यामध्‍ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका, तसेच इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news