WTC Final : जाणून घ्‍या द. आफ्रिका संघाला कसा लागला 'चोकर्स टॅग' ?

तब्‍बल सातवेळा संघाला विजेतेपदापासून मिळाली हुलकावणी!
WTC Final 2025 SA vs AUS
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. रबाडाच्या भेदक माऱ्यामुळे कांगारूंचा पहिला डाव केवळ 212 धावांत आटोपला. File Photo
Published on
Updated on

आजवर अनेकवेळा आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट स्‍पर्धेतील अजिंक्‍यपद दृष्‍टिक्षेपात असताना मोक्‍याच्‍या क्षणी कच खात असल्‍यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला ‘चोकर्स’ असा शिक्का बसला होता. १९९२ मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पुनरागमन केलेल्‍या संघात जागतिक दर्जाची प्रतिमा असणारे एकापेक्षा एक दिग्‍गज खेळाडू... मैदानावर विरोधी संघाला धडकी भरविणारी कामगिरी... तरीही १९९२पासून आजपर्यंत संघाला संघ आयसीसीच्‍या ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं नव्‍हतं. (अपवाद १९९८ चॅम्‍पियन ट्रॉफीचा ). अखेर आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्‍ये दक्षिण आफ्रिका संघ विजयाच्‍या उबंरठ्यावर येवून ठेपला आहे. जाणून घेवूया दक्षिण आफ्रिका संघावर चोकर्स टॅग लावणार्‍या सामन्‍यांविषयी. यातील काही निकाल दुर्दैवी आहेत, तर काही संघातील खेळाडूंच्‍या बेदरकार वृत्तीमुळे झाले हाेते...

१९९२ चा विश्‍वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य सामन्‍यात डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिका संघाला एका चेंडूत अशक्य २२ धावांचे लक्ष्‍य देण्‍यात आले.
१९९२ चा विश्‍वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य सामन्‍यात डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिका संघाला एका चेंडूत अशक्य २२ धावांचे लक्ष्‍य देण्‍यात आले. File Photo

विश्वचषक १९९२: उपांत्य फेरीत दुर्दैवी पराभव

दक्षिण आफ्रिका म्‍हटलं की क्रिकेटप्रेमींना १९९२ चा विश्‍वचषक स्‍पर्धा आठवते. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पुनरागमन करणार्‍या दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली. या संघाने उत्‍कृष्‍ट क्रिकेटचे प्रदर्शन कर उपांत्‍य फेरीत धडक मारली. ४५ षटकांमध्‍ये २५३ धावांचे लक्ष्‍य होते. अखेर १३ चेंडूत केवळ २२ धावांची गरज होती. मात्र मोक्‍याची क्षणी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे झालेल्‍याने विलंबामुळे डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे संघाला एका चेंडूत अशक्य २२ धावांचे लक्ष्‍य देण्‍यात आले. दक्षिण आफ्रिका संघाला विश्‍वचषक दृष्‍टिक्षेपात असताना सामना गमवावा लागला.

१९९९ विश्वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीत दक्षिण आफ्रिका संघाचा अवघ्‍या एका धावेने पराभव झाला हाेता.
१९९९ विश्वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीत दक्षिण आफ्रिका संघाचा अवघ्‍या एका धावेने पराभव झाला हाेता. File Photo

१९९९ चा विश्वचषक: उपांत्य फेरीत ओढावून घेतलेला पराभव

१९९२ नंतर १९९९ विश्वचषक स्‍पर्धेतही दक्षिण आफ्रिका संघाने उपांत्‍य फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध२१४ धावांचा पाठलाग करताना अखेर ४ चेंडूत विजयासाठी १ धाव आवश्‍यक होती. मात्र ९ विकेट गमावल्‍या होत्‍या. फॉर्ममध्ये असलेला लान्स क्लुजनर स्ट्राईकवर होता.तर ॲलन डोनाल्‍ड नॉनस्‍ट्राईकवर होता. लान्‍सने मारलेल्‍या फटक्‍यानंतर दोघांमध्‍ये धाव घेण्‍यावरुन गोंधळ उडाला आणि संघ २१३ धावांवर बाद झाला. अवघ्‍या एका धावेने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत अंतिम सामन्‍यात धडक मारली होती.

२००३ विश्वचषक: पुन्‍हा पावसाचा फटका

२००३ विश्‍वचषक स्‍पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला. मात्र यावेळी डकवर्थ-लुईस नियम समजून घेण्‍यात दक्षिण आफ्रिकेच्‍या खेळाडूंनी चूक केली. जेव्हा संघ व्यवस्थापनाने फलंदाजांना डकवर्थ-लुईस नियमानुसारची धावसंख्‍य सांगितली तेव्हा मार्क बाउचर आणि त्याच्या साथीदाराहा ही धावसंख्‍या विजयाची वाटली. स्कोअर सहज गाठल्यानंतर बाउचरने शेवटचा चेंडू रोखला. पुन्‍हा पावसाने खेळात हस्तक्षेप केला. अखेर श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसाने थांबवला तेव्हा डकवर्थ-लुईस नियमानुसार धावसंख्‍या बरोबरीत होती. त्‍यामुळे संघावर बादफेरीतच गारद होण्‍याची नामुष्‍की ओढावली.

विश्वचषक २०१५ : उपांत्य फेरीत न्‍यूझीलंडकडून पराभव

२०१५ विश्‍वचषक स्‍पर्धेतही दक्षिण आफ्रिकेने उपांत्‍य फेरीत धडक मारली. न्यूझीलंडविरुद्धच्‍या सामन्‍यात पावसामुळे ४३ षटकांत २८१/५ धावा केल्‍या. दक्षिण आफ्रिका संघ आघाडीवर होता. न्‍यूझीलंड संघाची अवस्‍था ४ बाद १४९ होती. त्यानंतर ग्रँट इलियट आणि कोरी अँडरसन यांनी पाचव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस समीकरणानुसार चार विकेटनी नमविले.

विश्वचषक २०२३ : उपांत्य फेरीत नामुष्‍कीजनक पराभव

२०२३ मध्ये, दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा अंतिम चारमध्ये प्रवेश केला, परंतु त्यांना त्यांचा पहिला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ २४/४ असा घसरला आणि तो घोंघावणाऱ्या वेगाने धावा करत होता हे पाहून चाहते घाबरले. तथापि, सहाव्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड मिलरने शानदार शतक झळकावून कोलकाता येथे एका वळणाच्या ट्रॅकवर २१२ धावांचा संघर्षपूर्ण आकडा उभा केला. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ६ षटकांत ६० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिले. जोश इंगलिस आणि स्टीव्ह स्मिथने लक्ष्याकडे धाव घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघ १३७ धावांवर तंबूत परतला होता. परंतु अखेर आठव्या विकेटसाठी मिशेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी निर्णायक २० धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला आणखी एका विश्वचषक अंतिम फेरीत नेले.

टी-२० विश्वचषक २०२४ :  भारताकडून पराभूत

२०२४ टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने प्रथमच अंतिम फेरी गाठली. या स्‍पर्धेत संघाचा खेळ अत्‍यंत प्रभावी होती. मात्र भारताविरोधातील सामन्‍यात शेवटच्या पाच षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकाच्‍या फलंदाज पुन्‍हा अपयशी ठरले. भारताने पुनरागमन करत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं.मोक्याच्या क्षणी कच खात असल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला ‘चोकर्स’ असा शिक्का कायम राहिला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: पुन्‍हा एकदा उपांत्‍य फेरीत प्रवास संपला

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघाने एकही सामना न गमावता अंतिम चार संघात स्‍थान पटकावले होते. मात्र न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना गमावला. ५ मार्च २०२५ रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्‍या सामना न्यूझीलंडने ५० धावांनी जिंकला . दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ पुन्हा एकदा 'चोकर्स' असल्याचे सिद्ध झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news