ICC ODI rankings : केशव बनला ‘वनडे’चा ‘महाराज’! आयसीसी क्रमवारीत हनुमानभक्ताची अव्वल स्थानी मुसंडी

ODI bowling rankings update : वनडे न खेळताही शमी-बुमराहच्या क्रमवारीत सुधारणा
ICC ODI rankings : केशव बनला ‘वनडे’चा ‘महाराज’! आयसीसी क्रमवारीत हनुमानभक्ताची अव्वल स्थानी मुसंडी
Published on
Updated on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली असून, यामध्ये एक मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने दोन स्थानांची उल्लेखनीय झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या या प्रगतीमुळे भारताच्या कुलदीप यादवला मात्र फटका बसला आहे. दरम्यान, कसोटी क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. करण गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना खेळला गेला नाही.

‘महाराज’ अव्वल स्थानी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीचे केशव महाराजला फळ मिळाले आहे. त्या सामन्यात महाराजने १० षटकांत केवळ ३३ धावा देत कांगारूंच्या पाच प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले होते. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या रेटिंगमध्ये मोठी वाढ झाली असून, तो आता ६८७ रेटिंगसह अव्वल स्थानावर पोहचला आहे.

ICC ODI rankings : केशव बनला ‘वनडे’चा ‘महाराज’! आयसीसी क्रमवारीत हनुमानभक्ताची अव्वल स्थानी मुसंडी
Shreyas Iyer Asia Cup : ‘आमची चूक नाही… श्रेयसला वाट पाहावी लागेल’, अय्यरला वगळल्यावरून मुख्य निवडकर्त्यांचा खुलासा

हनुमानभक्त म्हणून विशेष ओळख

केशव महाराज याची भारतात एक हनुमानभक्त म्हणून विशेष ओळख आहे. काही काळापूर्वी भारत दौऱ्यावर असताना त्याने अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्याने आपण हनुमानाचे निस्सीम भक्त असल्याचे सांगितले होते.

ICC ODI rankings : केशव बनला ‘वनडे’चा ‘महाराज’! आयसीसी क्रमवारीत हनुमानभक्ताची अव्वल स्थानी मुसंडी
Women's ODI World Cup : मिशन वर्ल्ड कप.. टीम इंडियाने फुंकले रणशिंग! हरमन-स्मृतीच्या खांद्यावर जेतेपदाची धुरा

कुलदीप यादवला फटका

केशव महाराजच्या या प्रगतीमुळे दोन गोलंदाजांना थेट फटका बसला आहे. यामध्ये श्रीलंकेचा महीशा तीक्षणा आणि भारताचा कुलदीप यादव यांचा समावेश आहे. यापूर्वी अव्वल स्थानी असलेला तीक्षणा आता ६७१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. तर, भारताचा कुलदीप यादव एका स्थानाने खाली येत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे सध्याचे रेटिंग ६५० इतके आहे. क्रमवारीतील अव्वल १० गोलंदाजांमध्ये इतर कोणताही मोठा बदल झालेला नाही. वेस्ट इंडिजचा गुडाकेश मोती १२व्या स्थानावरून ११व्या स्थानी आला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडची ११व्या स्थानावरून १२व्या स्थानी घसरण झाली आहे.

ICC ODI rankings : केशव बनला ‘वनडे’चा ‘महाराज’! आयसीसी क्रमवारीत हनुमानभक्ताची अव्वल स्थानी मुसंडी
Asia Cup Team India Announcement : आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर! गिल उपकर्णधार, श्रेयस अय्यरला पुन्हा डच्चू

बुमराह, शमी, सिराज यांना किरकोळ लाभ

विशेष म्हणजे, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी गेल्या काही काळापासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, तरीही दोघांच्या क्रमवारीत प्रत्येकी एका स्थानाने सुधारणा झाली आहे. शमी १३व्या, तर बुमराह १४व्या स्थानी पोहोचला आहे. मोहम्मद सिराजनेही एका स्थानाने प्रगती करत १५वा क्रमांक गाठला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या खराब कामगिरीमुळे त्याची दोन स्थानांनी घसरण झाली, ज्याचा अप्रत्यक्ष लाभ या भारतीय गोलंदाजांना मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news