Sanju Samson: संजू सॅमसनचा जलवा! ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड जिंकत बुमराहला टाकलं मागे

Sanju Samson ICC Player of the Month: संजू सॅमसनने ICC प्लेयर ऑफ द मंथ (मार्च) पुरस्कार जिंकला आहे. त्याने जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंना मागे टाकलं आहे.
Sanju Samson
Sanju SamsonPudhari
Published on
Updated on

Sanju Samson ICC Player of the Month: भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बातमी आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर-बॅटर संजू सॅमसनने ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ (मार्च) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला आहे. विशेष म्हणजे, त्याने या स्पर्धेत जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कॉनर एस्टरहुइजन यांना मागे टाकलं.

पहिल्यांदाच मिळाला मोठा सन्मान

संजू सॅमसनसाठी हा पुरस्कार खास आहे, कारण त्याने पहिल्यांदाच ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड जिंकला आहे. त्याच्या अलीकडच्या जबरदस्त कामगिरीचं हे मोठं फळ मानलं जात आहे.

बेंचवरून मैदानात आणि थेट हिरो

T20 वर्ल्ड कप 2026 च्या सुरुवातीला सॅमसनला प्लेइंग XI मध्ये स्थान मिळालं नव्हतं. तो सुरुवातीचे सामने बेंचवर बसूनच पाहत होता. पण चेन्नईमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात त्याला संधी मिळाली आणि इथूनच त्याने धमाकेदार कमबॅक केलं.

Sanju Samson
Vaibhav Suryavanshi | आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचं 'सरप्राईज पॅकेज'? IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची होणार निवड?

फायनलमध्ये मॅच-विनिंग खेळी

सॅमसनने फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 46 चेंडूत 89 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत त्याने 5 सामन्यांत 321 धावा केल्या, आणि त्याची सरासरी तब्बल 80.2 होती.

सॅमसन काय म्हणाला?

हा पुरस्कार जिंकल्यानंतर सॅमसनने आनंद व्यक्त करत म्हटलं की, क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात खास क्षणांपैकी हा एक क्षण आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांचे आणि कोचिंग स्टाफचेही आभार मानले, ज्यांच्या पाठिंब्यामुळे तो सर्वोत्तम प्रदर्शन करू शकला.

Sanju Samson
Shane Warne Death: शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळेच झाला; मुलाच्या दाव्याने मोठी खळबळ, नेमकं काय म्हणाला?

महिला गटात अमेलिया केरचा दबदबा

पुरुष गटासोबत महिला गटातही ICC ने पुरस्कार जाहीर केला आहे. न्यूझीलंडची स्टार ऑलराऊंडर अमेलिया केर हिने महिला प्लेयर ऑफ द मंथचा किताब जिंकला.

तिने मार्च महिन्यात 4 वनडे सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या आणि 176 धावा केल्या.
झिम्बाब्वेविरुद्ध एका सामन्यात तिने 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news