ICC Award : सॅमसनचे नशीब उजळले! ICC पुरस्कारासाठी नामांकन, थेट बुमराहशी रंगणार स्पर्धा

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये संजू सॅमसनची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली
ICC Award : सॅमसनचे नशीब उजळले! ICC पुरस्कारासाठी नामांकन, थेट बुमराहशी रंगणार स्पर्धा
Published on
Updated on

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने मार्च महिन्यातील 'प्लेयर ऑफ द मंथ' या पुरस्कारासाठी संजू सॅमसनला नामांकन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या शर्यतीत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा कॉनर एस्टरहुइजन यांचेही नाव असून, आता या तिघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

सॅमसनचे टी-२० विश्वचषकात शानदार पुनरागमन

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये संजू सॅमसनची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. संधी मिळाल्यानंतरही सुरुवातीला त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, मात्र जशी स्पर्धा पुढे सरकली, तशी संजूने आपल्या बॅटची कमाल दाखवत सर्वांना थक्क केले. आता आयसीसीने त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याला गौरविले आहे.

नॉकआऊट सामन्यांत धावांचा पाऊस

टी-२० विश्वचषकात संजू सॅमसनचा खरा फॉर्म मार्च महिन्यातील निर्णायक सामन्यांमध्ये दिसून आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो'च्या सामन्यात संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करून भारताला उपांत्य फेरीत पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

उपांत्य फेरी : इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात संजूने ८९ धावांची वादळी खेळी केली.

अंतिम फेरी : न्यूझीलंडविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीतही त्याने पुन्हा एकदा ८९ धावा फटकावत संघाच्या विजयात योगदान दिले.

आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत सलग तीन अर्धशतके झळकावल्यामुळे संजूला 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. केवळ मार्च महिन्याचा विचार केला, तर संजूने १३७.५० च्या सरासरीने आणि १९९.२७ च्या स्ट्राईक रेटने तब्बल २७५ धावा कुटल्या आहेत.

बुमराह आणि कॉनर एस्टरहुइजनचेही आव्हान

पुरस्काराच्या या शर्यतीत भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह याचेही नाव अग्रक्रमाने आहे. भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात बुमराहचा वाटा मोलाचा होता.

वेस्ट इंडिजविरुद्ध : २ बळी.

उपांत्य फेरी : अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत १ बळी.

अंतिम फेरी : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये केवळ १५ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूत धाडले.

या दोन भारतीयांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजन यालाही नामांकन मिळाले आहे. त्यानेही मार्च महिन्यात अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता या तिघांपैकी आयसीसीचा हा बहुमान कोणाला मिळतो, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news