ICC Award : आयसीसीकडून 'प्लेअर ऑफ द मंथ'ची घोषणा; भारतीय खेळाडूची पुरस्कावर मोहोर

ICC Player of the Month : पुरुष गटात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची बाजी
ICC Award : आयसीसीकडून 'प्लेअर ऑफ द मंथ'ची घोषणा; भारतीय खेळाडूची पुरस्कावर मोहोर
Published on
Updated on

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २३ मार्च २०२६ रोजी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारांची घोषणा केली आहे. फेब्रुवारी २०२६ या महिन्यासाठी महिला गटात भारतीय संघाची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तिच्या विलोभनीय कामगिरीची दखल घेत आयसीसीने तिला या बहुमानाने गौरविले आहे. पुरुष गटात पाकिस्तानच्या खेळाडूने बाजी मारली आहे.

अरुंधती रेड्डीची ऐतिहासिक कामगिरी

अरुंधती रेड्डीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ८ बळी मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेत तिची सरासरी १०.८७ तर इकॉनॉमी रेट ७.२५ इतका राहिला. विशेषतः सिडनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने केवळ २२ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूत धाडले होते. या पुरस्कारासाठी श्रीलंकेची हर्षिता समरविक्रमा आणि पाकिस्तानची फातिमा सना यादेखील शर्यतीत होत्या, मात्र त्यांना मागे टाकत अरुंधतीने कारकिर्दीत पहिल्यांदाच 'प्लेअर ऑफ द मंथ'चा किताब पटकावला आहे.

"आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका जिंकण्यात मोलाचे योगदान देता आले, याचे समाधान अधिक आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवणे सोपे नसते, त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला असून आगामी महिला टी-२० विश्वचषकातही आम्ही अशीच कामगिरी करू," असे अरुंधतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर नमूद केले.

पुरुष गटात साहिबजादा फरहानचा दबदबा

पुरुष गटात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याला फेब्रुवारी महिन्याचा 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवडण्यात आले आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरल्याने फरहानने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स आणि अमेरिकेचा वेगवान गोलंदाज शॅडली वॅन शाल्विक यांना मागे टाकले. वैयक्तिक स्तरावर फरहानची कामगिरी उत्कृष्ट असली तरी, पाकिस्तानचा संघ या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात अपयशी ठरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news