T20 World Cup 2026 : जपान-जर्मनीही क्रिकेटच्या प्रेमात! टी-20 वर्ल्डकपच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ

Cricket Viewership Record : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याने मोडले प्रक्षेपणाचे सर्व विक्रम; भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयांनाही टाकले मागे
T20 World Cup 2026 : जपान-जर्मनीही क्रिकेटच्या प्रेमात! टी-20 वर्ल्डकपच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ
Published on
Updated on

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ ने बाद फेरी सुरू होण्यापूर्वीच डिजिटल क्षेत्रात यशाचे नवे शिखर गाठले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने दिलेल्या माहितीनुसार, चालू स्पर्धेने ICC.tv आणि आयसीसीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ही स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक 'डिजिटल एंगेजमेंट' लाभलेली आणि जागतिक स्तरावर सर्वाधिक पोहोचलेली स्पर्धा ठरण्याच्या मार्गावर आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले होते. आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर पोहोचली असून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंड या चार संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. आयसीसीच्या अहवालानुसार, एकाच वेळी सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत झालेली वाढ आणि अपारंपरिक बाजारपेठांमधील विस्तार यामुळे हे यश मिळाले आहे.

T20 World Cup 2026 : जपान-जर्मनीही क्रिकेटच्या प्रेमात! टी-20 वर्ल्डकपच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ
SA vs NZ Semi Final : १९ वर्षांचा दुष्काळ, ५ पराभव..! द. आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडची पाटी कोरीच, उपांत्य फेरीत इतिहास बदलणार का?

बाद फेरीपूर्वीच विक्रमांचा पाऊस

आयसीसीने नमूद केले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या सामन्यादरम्यान ICC.tv वर एकाच वेळी सर्वाधिक प्रेक्षक उपस्थित राहण्याचा नवा जागतिक विक्रम नोंदवला गेला. याच विजयामुळे भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. यापूर्वीचा उच्चांक २०२४ च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या वेळी नोंदवला गेला होता.

विशेष म्हणजे, बाद फेरीचे सामने अद्याप बाकी असतानाच, २०२६ च्या आवृत्तीने २०२४ च्या संपूर्ण स्पर्धेतील एकूण युजर्स आणि एकूण मिनिटांचा विक्रम मागे टाकला आहे. २०२४ च्या तुलनेत यंदा युनिक युजर्समध्ये २८% आणि एकूण प्ले-टाइममध्ये ५६% वाढ झाली आहे.

T20 World Cup 2026 : जपान-जर्मनीही क्रिकेटच्या प्रेमात! टी-20 वर्ल्डकपच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ
IND vs ENG Semi Final : टीम इंडियाला फायनलपूर्वीच मोठा धोका..! सेमीफायनल खेळण्याआधीच होणार ‘टाटा बाय बाय..’

सोशल मीडियावर १० अब्ज व्ह्यूजचा टप्पा पार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या स्पर्धेने आतापर्यंत १० अब्ज व्हिडिओ व्ह्यूजचा टप्पा ओलांडला असून, २०२४ मधील १६ अब्जांचा विक्रम मोडण्याच्या दिशेने ही स्पर्धा वेगाने वाटचाल करत आहे. प्रत्येक युजरचा सरासरी वॉच-टाइम सुद्धा ४७ मिनिटांवरून (२०२४ मधील सुपर-८ पर्यंत) वाढून आता ५८ मिनिटे झाला आहे.

प्रादेशिक भाषा आणि जागतिक विस्तार

आयसीसीच्या अपडेटनुसार, अव्वल पाच प्रक्षेपणांपैकी तीन प्रक्षेपण हे गैर-इंग्रजी भाषांमधील होते. ICC.tv ने हिंदी, उर्दू, नेपाळी, जपानी आणि बहासा इंडोनेशिया या भाषांमध्ये समालोचन उपलब्ध करून दिल्याने विविध क्रिकेट समुदायांशी जोडले जाणे सोपे झाले आहे.

सर्वात लक्षणीय वाढ क्रिकेटसाठी अपारंपरिक मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये दिसून आली आहे.

  • जर्मनी : युनिक युजर्समध्ये १५०% वाढ.

  • इटली : १३६% वाढ.

  • जपान आणि दक्षिण कोरिया : व्ह्यूज आणि युजर्समध्ये १००% पेक्षा जास्त वाढ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news