

USA Cricket Suspension By ICC :
आगामी ऑलिम्पिकची स्पर्धा ही लॉस एन्जल्स इथं २०२८ मध्ये होणार आहे. अमेरिकन (USA Cricket) क्रिकेट असोसिएशनसाठी ही मोठी संधी आहे. मात्र त्यापूर्वी जय शहांच्या अध्यक्षतेखालच्या आयसीसीनं अमेरिका क्रिकेट असोसिएशनला मोठा दणका दिलाय. आयसीसीनं युएसए क्रिकेट संघटनेचं सदस्यत्व तात्काळ प्रभावानं निलंबित करत असल्याचं जाहीर केलं. आयसीसीनं या बाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आयसीसीनं युएसए क्रिकेट बोर्ड हे आयसीसी सलग्न सदस्यांबाबतच्या नियमांचे आणि आयसीसीच्या संविधानाचं सतत उल्लंघ केल्यामुळं ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं. यामुळं युएसए क्रिकेटची अमेरिका आणि जगभरात पत घसरली आहे.
आयसीसी अधिकृत वक्तव्यात म्हणते, 'युएसए क्रिकेट बोर्डाचं निलंबन हे दुर्दैवी मात्र गरजंच पाऊल होते. हा निर्णय खेळाचं हित पाहून घेण्यात आला आहे. आता आयसीसी या निलंबनाच्या निर्णयाचा परिणाम खेळाडूंवर आणि खेळावर होऊ नये याची काळजी घेत आहे.'
आयसीसीच्या या निर्णयाचा परिणाम गा युएसएमधील राष्ट्रीय संघांवर पडणार नाहीये. त्यांना आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. यात २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एन्जल्स ऑलिम्पिक गेम्सचा देखील समावेश आहे. या निर्णयाचा ऑलिम्पिकच्या तयारीवर देखील परिणाम होणार नाही असा दावा आयसीसीनं केला आहे.
आयसीसी पुढे म्हणते की, 'या निर्णयामुळ आयसीसी युएसएसच्या क्रिकेटपटूंच्या हिताचा विचार करते हे दिसून येतं.यामुळं खेळाडूंचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रोग्राम देखील सूर ठेवण्यात येणार आहे. यामुळं युएसएमधील खेळाडूंना त्यांची गुणवत्ता आणि क्षमता सुधारण्यास मदत होणार आहे.